घरमहाराष्ट्रपुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; शरद पवारांची मागणी

पुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; शरद पवारांची मागणी

Subscribe

“ऊसाचे वैशिष्ट्य त्या पिकाच्या उंचीपेक्षा जास्त पाऊस आले तर पीक वाया जाते. काही ठिकाणी फळबागांमध्ये द्राक्ष, डाळींब यांचे उत्पादन घेतले जाते, भाज्या घेतल्या जातात. शेतपिकाबरोबर बर्‍याच ठिकाणी जमिनीवरील माती वाहून गेल्याचे दिसत आहे, अशा शेतजमिनींचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. आता पाणी ओसरेल, तेव्हा या नुकसानीचा खरा आढावा घेता येईल. बांधलेली जनावरे शेतकर्‍यांनी सोडून दिली. कोल्हापूर, सांगली हा पट्टा महाराष्ट्रातील विकासाचा महत्त्वाचा पट्टा आहे, अशी स्थिती पूर्वी कधी पाहण्यात आली नव्हती. राज्य सरकारने नुकसान भरपाईची सुरू केली पाहिजे. पंजनामे सुरू केले पाहिजे. तसेच पुरग्रस्तभागातील लोकांना १०० टक्के कर्जमाफी दिली पाहीजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

सध्याच्या संकटात सेवाभावी, सामाजिक संस्थां आणि तरुणांनी पुढे येऊन मदत केली पाहीजे, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार, खासदार यांनी एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ५० लाखांचा धनादेश सोमवारी देण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाच्या विविध संघटनातर्फेही मदत दिली जाणार आहे. आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यामार्फत काही ट्रक औषधे पुरग्रस्त भागात देण्यात येणार आहेत. आमच्या पक्षाचा डॉक्टर सेल प्रभावी असून त्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी टीम तयार ठेवली आहे. पुरग्रस्त भागात जाऊन ते मदतकार्य सुरु करतील, असेही शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी वेळीच पाहणी करणे अपेक्षित होते

अशा संकटांच्या वेळी खरे तर राज्याच्या प्रमुखाने तातडीने जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे. लातूर येथे भूकंप झाला तेव्हा मी तातडीने घटनास्थळी जावून पाहणी केली होती. कारण अशा संकटांकडे राज्याचा प्रमुख जेवढा गांभीर्याने पाहतो, तेवढी शासकीय यंत्रणा हलत असते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची यात्रा थांबवून आधी पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे, राजकारण बाजुला ठेवून केंद्राने राज्याला मदत केली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली असून ही यात्रा केवळ दुष्काळी भागात आयोजित केली होती. ती स्थगित केल्याचे पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यात निर्माण झालेली पुरपरिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आजपासून तुर्तास स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तर ६ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराने वेढले आहे. या पुरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा आजपासून तुर्तास स्थगित करण्यात आली असून पुरपरिस्थिती नियंत्रणात आल्यावर या यात्रेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -