सोनं पुन्हा महागलं ‘हा’ आहे आजचा सोन्याचा भाव!

Mumbai
gold, silver prizes
'सोन्या'ने चाळीशी गाठली; 'चांदी'ही महागली

सोन्याच्या भाव पुन्हा वधारला आहे. गेले काही दिवस ४० हजारांच्या खाली आलेल्या सोन्याचा  पुन्हा एकदा भाव वधरला आहे.  कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने मंगळवारी सोने दरात तेजी दिसून आली. सध्या सोने ४१ हजार ५८२ रुपयांवर ट्रेड करत आहे.

गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण झाली होती. करोना व्हायरसच्या परिणामामुळेच आज सोन्याची किंमत कमी होण्यावर परिणाम झाला  होता. करोनाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या विविध देशांमधील अर्थव्यवस्थांवर असणाऱ्या दबावामुळेच हे दर घसरले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पहिल्यांदाच सोन्याचे दर तब्बल ५.१ टक्के खाली घसरले होते. सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम मागे ३९ हजार ६५० रूपये इतका खाली आला आहे.

मात्र मागील दोन दिवस चीनमधील करोनाचा प्रकोप कमी झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पॅकेज घोषित करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली होती. स्पॉट गोल्ड १.७ टक्क्यांनी वधारून १५७८.८३ डॉलर प्रती औंस इतके झाले. अमेरिकेत सोने १.६ टक्क्यांनी वधारून १५९२.२० डॉलर प्रती औंसपर्यंत पोहचले आहे.

सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने ४१ हजार १६३ रुपयांवर बंद झाले होते. आज चांदीच्या दरात देखील ४.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव ३९ हजार ६४२ रुपये आहे.


हे ही वाचा – CoronaVirus: कस्तुरबामधील उपचार घेणारे १२ रुग्ण व्हायरस फ्री!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here