घरमहाराष्ट्रभारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी- नितीन गडकरी

भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी- नितीन गडकरी

Subscribe

विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उद्योगांवर आधारित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमात एकूण २२ देशांतील शिष्टमंडळांचा सहभाग होता.

भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मानकापूर स्थित विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या वतीने आयोजित ७९ व्या अधिवेशनात विविध विदेशी शिष्टमंडळानी श्री. गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.या विदेशी शिष्टमंडळात इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, भूतान,अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, इटली, ऑस्ट्रीया, दुबई, इस्त्रायल यासह एकूण २२ देशांतील शिष्टमंडळांचा सहभाग होता. भारताच्या पायाभूत सुविधांना सरकार पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले गडकरी

“पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भारताचा भर आहे. त्यामध्ये देशातील रस्ते, महामार्ग, रेल्वे, जहाजबांधणी, बंदरे,नद्यांमधून करण्यात येणारी जलवाहतूक, विमानतळे बांधणीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा उभारणी आणि त्यांचे बांधकाम, त्यात लागणारे साहित्य यामुळे गुंतवणुकीत प्रचंड वाव आहे. उज्वल भारताच्या पायाभरणीत गुंतवणुकदारांनी सहभागी व्हावे. विदेशीगुंतवणुकीची ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ला गरज आहे.”- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी

- Advertisement -

विदेशी गुंतवणूक करण्यात उत्सूक

देशातील कंपन्या वाढत असून सरकारने त्यांच्यासाठी विविध योजाना आखल्या आहेत. देशाती प्रगती बघून विदेशी उद्योजकही भारताकडे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होत आहेत. विदेशी शिष्टमंडळाने देशात गुंतवणूक करण्यात उत्सूक असल्याचे  गडकरीयांनी सांगितले. शाश्वत विकासासाठी त्यांच्या कंपन्याकडून विकास प्रक्रियेत रस्ते बांधणी, विमानतळे, बंदरे, जहाजबांधणी, रेल्वे बांधकाम आणि जलवाहतुकीसाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन बनविलेली असल्याचे ही ते म्हणाले. येत्या काळात सरकार उद्योगाच्या विकासावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -