घरमहाराष्ट्रपतीसोबत झाला वाद; २५ वर्षीय महिलेने आपल्या मुलीसह विहरीत घेतली उडी

पतीसोबत झाला वाद; २५ वर्षीय महिलेने आपल्या मुलीसह विहरीत घेतली उडी

Subscribe

मायलेकींचा शोध सुरू असताना घरासमोरील विहिरीत पदमा आणि मुस्कान या दोघींचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला.

गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून पतीसोबतच्या भांडणानंतर २५ वर्षीय पत्नीने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. २५ वर्षीय पदमा उईके या महिलेने आपल्या १८ महिन्याची मुलगी मुस्कान उईके हिच्यासह विहरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिरामनटोला गावात ही घटना घडली असून परिसरात चर्चांना उधान आले आहे.

असा घडला प्रकार

गोंदिया तालुक्याच्या चिरामनटोला गावात राहणाऱ्या पदमा उईके या महिलेचे सोमवारी रात्री तिच्या पती पंकज उईके सोबत वाद विवाद झाले. तर पदमाची समजूत घालण्यासाठी तिचे वडील तिच्या घरी आले होते. त्यांनी देखील पदमाची समजूत घातली होती. सकाळी घरातील सर्व सदस्य उठल्यावर पदमा आणि मुलगी मुस्कान या दोघी घरात नव्हत्या. त्यामुळे त्यांची शोधा शोध सुरू झाली.

- Advertisement -

आसपास सगळीकडे मायलेकींचा शोध सुरू असताना घरासमोरील विहिरीत पदमा आणि मुस्कान या दोघींचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटूंब हादरले आणि घडलेला प्रकार कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले असून यासंदर्भात तक्रार दाखल केली असून पदमाने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा शोध रावणवाडी पोलीस घेत आहेत.


पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय; चार्जरच्या वायरने गळा आवळून तिसऱ्या पतीचा केला खून
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -