घरमहाराष्ट्रडेक्कन क्वीनच्या प्रवाशांना खुशखबर!

डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना खुशखबर!

Subscribe

डेक्कन क्वीनला दुहेरी इंजिन जोडल्याने सव्वातीन तासांचा प्रवास पावणेतीन तासांवर येणार आहे.

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनच्या राणीचा वेग येणाऱ्या काही दिवसांत वाढणार आहे. पुश अॅंड पुल या तंत्रज्ञानामुळे प्रवासाचे अंतर ३० ते ३५ मिनिटांनी कमी होणार आहे. येत्या काही महिन्यात पुश अॅंड पुल तंत्रज्ञानानुसार, गाडीला पुढच्या आणि मागच्या बाजूस इंजिन जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. यापुर्वी पुश अॅंड पुल तंत्रज्ञानानुसार मध्य रेल्वे कडून लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढावा यासाठी राजधानी, निजामुद्दीनसह अनेक गाड्यांना दोन इंजिन जोडण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर डेक्कन क्वीनचा वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडीस दोन्ही बाजूस इंजिन लावल्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त वेग पकडू शकणार आहे.

सव्वातीन तासांचा प्रवास पावणेतीन तासांवर

पुणे स्थानकातून सकाळी ७.१५ वाजता डेक्कन क्वीन सुटते. मुंबईत सकाळी १०.२५ वाजता पोहचण्याची वेळ आहे. परत जाण्याच्या प्रवासाकरिता मुंबईमधून संध्याकाळी ५.१० वाजता निघून पुण्यात रात्री ८.२५ वाजता पोहचते. सव्वातीन तास इतका कालावधी पुणे- मुंबई या प्रवासास लागत होता. परंतु आता या डेक्कन क्वीनला जोडल्याने हा सव्वातीन तासांचा प्रवास पावणेतीन तासांवर येणार आहे.

- Advertisement -

प्रवाशांचा वेळ वाचणार

१ जून रोजी डेक्कन क्वीन ९०व्या वर्षात पदार्पण होणार आहे. या क्वीनच्या वाढदिवसानिमित्त पुणे स्थानकातून गाडीला दुहेरी इंजिन जोडावे. अशी मागणी करत डेक्कन क्वीनला जोडण्यात येणाऱ्या दुहेरी इंजिनामुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -