घरमहाराष्ट्रकोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी खुशखबर

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी खुशखबर

Subscribe

गणेशोत्सवासाकरिता कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी खुशखबर आहेत. कोकणात जाणार्‍यांची प्रवाशांची तुफान गर्दी लक्षात घेता. मध्य रेल्वेने 166 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाकरिता कोकणात जाणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी काही प्रमाणात सोय होणार आहेत. या 166 विशेष ट्रेन मुंबई, एलटीटी,दादर, पनवेल, पुणे स्थानकातुन करमाळी,सावंतवाडी,रत्नागिरी आणि पेरनम या स्थानकांसाठी या विशेष चालविण्यात येणार आहेत. 25 मे पासून प्रवासी या विशेष ट्रेनचे आरक्षण करु शकणार आहेत.

यंदा गणरायाचे आगमन 2 सप्टेंबर रोजी होणार आहेत. रेल्वेचे आरक्षण सुरूच होतात मेल एक्सप्रेस गाड्याचे आरक्षण हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे हजारो इच्छुक गणेशभक्ता कोकणात जाण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागण्याची वेळ आली आहेत. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आता मध्य रेल्वेने 166 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे आखणी विशेष ट्रेन चालविण्याच्या विचार मध्य रेल्वे करत आहेत. सद्या 166 विशेष ट्रेन अश्या प्रमाणे आहेत. मुंबई ते सावंतवाडी( 26 फेर्‍या) ही ट्रेन 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. 01001 मुंबई ते सावंतवाडी ट्रेन रात्री 12.20 वाजता असुन सावंतवाडीला दुपारी 2.10 वाजता पोहचणार आहे.

- Advertisement -

तर परतीच्या प्रवासासाठी 01002 सावंतवाडी ते मुंबई ट्रेन त्याच दिवशी दुपारी 3 वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे 3.40 वाजता पोहचणार आहे. 01007 मुंबई ते सांवतवाडी (12 फेर्‍या) ट्रेन 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी आणि शनिवारी रात्री 12.20 वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी 2.10 वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 01008 सावंतवाडी ते मुंबई ट्रेन दुपारी 3 वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे 3.40 वाजता पोहचणार आहे. 01033 मुंबई-रत्नागिरी-पनवेल (22 फेर्‍या) 28 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान धावणार आहेत.

सीएसएमटीहून सकाळी 11.30 वाजता सुटणार असून त्याच दिवशी रात्री 10 वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 01034 रत्नागिरीहून रात्री 10.50 वाजता सुटुन पनवेलला दुसर्‍या दिवशी सकाळी 7.15 वाजता पोहचणार आहे. पनवेल-सावंतवाडी-मुंबई (22 फेर्‍या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेरनम (6 फेर्‍या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते झराप (6 फेर्‍या ), लोकमान्य टिळक टर्मिनस- झाराप- पनवेल (8 फेर्‍या), पनवेल – सावंतवाडी (8 फेर्‍या), पनवेल- थिवीम (8 फेर्‍या). पुणे – रत्नागिरी (6 फेर्‍या) वाया कर्जत-पनवेल, पुणे- करमाळी (2 फेर्‍या), पनवेल-सावंतवाडी या विशेष गाड्या चालविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -