घरCORONA UPDATEअभिनंदन! राज्यातील 'हे' शहर झालं कोरोनामुक्त!

अभिनंदन! राज्यातील ‘हे’ शहर झालं कोरोनामुक्त!

Subscribe

या आधी मनमाड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१ होती.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र तरीही राज्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मनमाड हे शहर आता कोरोनामुक्त झालं आहे. मनमाड मधील शेवटच्या दोन रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे शहरात आता एकही कोरोनाबाधित रूग्ण उरलेला नाही.

या आधी मनमाड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१ होती. एक एक करत कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आता एक ही कोरोनाबाधित रुग्ण उरला नाही. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थित शेवट्या दोन्ही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहार आता कोरोनामुक्त झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

शहर कोरोनामुक्त झाले असले तरी धोका मात्र टळला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन केल्यास पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री होणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केला.

२ मे रोजी शहरात कोरोनाची एन्ट्री झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत गेली आणि बाधित रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, आरोग्य विभाग या सर्वांनी वेगवेगळ्या उपाययोजना करून आपापली जबाबदारी पार पाडली.

- Advertisement -

हे ही वाचा – दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही हॉटेलमध्ये चिनी नागरिकांना बंदी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -