उद्योजकाकडे मागितली २० लाखांची खंडणी

अंबरनाथ येथील एका कारखानदाराकडून तब्बल २० लाखाची खंडणी मागण्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे न दिल्यास कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिल्यामुळे या व्यापाऱ्याने पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.

Ambrnath
Kidnap
प्रातिनिधिक फोटो

एका कारखानदाराला मोबाईल फोन वरून धमकावीत अज्ञात इसमाने २० लाखांची खंडणी मागितली, हे पैसे दिले नाही तर तुझ्या कुटुंबियांना ठार मारू अशी धमकी देऊन या खंडणीची मागणी करण्यात आली. खेळणी बनवणाऱ्याचा कारखाना असल्यामुळे या कारखानदाराकडून पैशाची मागणी केली जात होती.

कसा घडला प्रकार

अंबरनाथ (प) येथे शंकर हाईट्स या गृहसंकुलात राहणाऱ्या मोहम्मद नौशाद आलम (३३) यांचा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या “उद्योग विहार” येथे खेळणी बनविण्याचा कारखाना आहे. मोहम्मद यांना काही दिवसांपासून विविध मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन येत आहेत त्यात त्यांना २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. हे पैसे दिले नाही तर मोहम्मद तसेच त्यांचा लहान भाऊ, वडील यांना ठार मारू अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मोहम्मद यांनी काल गुरुवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश गायकर हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here