घरदेश-विदेशशिवजयंतीला गालबोट; सैनिकांना जेवणाच्या ताटावरुन हाकललं

शिवजयंतीला गालबोट; सैनिकांना जेवणाच्या ताटावरुन हाकललं

Subscribe

दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे यंदाच्या शिवजयंतीला गालबोट लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि देशभरात उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र देशाच्या राजधानीत शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. झाले असे की, शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्करातील गोरखा रेजिमेंटच्या बँडचे जवान दिल्लीत आले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था दिल्लीतील महाराष्ट्र सदनात केली होती. मात्र आज दुपारी जेवणाच्या ताटावरुन जवानांना उठवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकारावर आता सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.

काय घडलं महाराष्ट्र सदनात?

आज सकाळी ६ वाजता गोरखा रेजिमेंट जवान महाराष्ट्र सदनात दाखल झाले होते. गोरखा रेजिमेंटचे जवान लष्कराव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत. परंतु यावर्षी पहिल्यांदाच हे जवान शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनात आले होते. दुपारच्या वेळी जेवणासाठी जवान कॅन्टीनमध्ये आले होते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर हे तिथे दाखल झाले आणि त्यांना जवानांना ताटावरुन उठवले. “तुम्हाला इथं जेवता येणार नाही, तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे’ असे सांगत त्यांनी जवानांना कॅन्टीनमधून बाहेर काढले.

- Advertisement -

या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्र सदनात काहीवेळ तणाव निर्माण झाला. कार्यक्रमाच्या आयोजकांनी हस्तक्षेप करत हा प्रकार रोखण्याच्या प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांकडून धमकीची भाषा वापरण्यात आली. तसेच हे प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले. जवानांचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा, मात्र जवानांना दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे शिवभक्त नाराज झाले असून त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -