घरदेश-विदेशविमान प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

विमान प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Subscribe

देशात आजपासून विमान सेवा सुरु झाली असताना महाराष्ट्र सरकारने नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

देशात आजपासून विमान सेवा सुरु झाली. सर्व विमानतळांवर सामाजिक अंतराचे अनुसरण केलं जात आहे. अर्थात कोरोना संकट त्वरित संपणार नाही. अशा परिस्थितीत सध्याची परिस्थिती सामान्य म्हणून स्वीकारली गेली आहे आणि त्या आधारे नवी सुरुवात केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यांतून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही नियम तयार केले आहेत.

महाराष्ट्रात विमान प्रवास करुन येणाऱ्या प्रवाश्यांची थर्मल स्क्रिनिंग केली जाार आहे. तसंच डाव्या हातावर शिक्का मारण्यात येणार आहे. शिवाय, त्यांना १४ दिवस होम होम आयसोलेशन रहावं लागणार आहे. तथापि प्रवासी कोणत्या कार्यालयात काम करत असल्यास स्थानिक प्रशासन होम होम आयसोलेशनमधून सवलत देऊ शकते. प्रशासन आवश्यक असल्यासही सवलत देण्याबाबत विचार करू शकेल. एखादा प्रवासी महाराष्ट्रात आला आणि आठवड्यात परत गेला तर त्याला होम क्वारंटाइन राहण्याची गरज नाही. परंतु त्यासंबंधीचा तपशील त्याला राज्य सरकारला द्यावा लागेल. तसेच अशा प्रवाश्यांना कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. तथापी, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही, ही बाब या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आली आहे. राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमित करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊन नाही, जास्त टेस्टींग नाही, तरीही कोरोनावर जपानने विजय कसा मिळविला?


प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधीत एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन द्यावयाची आहे. आदी विविध सूचना मार्गदर्शिकेद्वारे देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने यासंदर्भात काल मार्गदर्शिका प्रसारित केली. ही मार्गदर्शिका हवाईमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल. कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लागू होईल. त्याला रस्त्याने विमानतळावर जाण्याची परवानगी दिली जाईल परंतु प्रवाश्याला कंटेनमेंट झोनमध्ये आणि बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. रेड झोनबाहेर जाण्यासाठी प्रवाशांना अगोदरच परवानगी घ्यावी लागेल. तथापी, या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल. प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणे बंधनकारक आहे. सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरिल संबंधीत घोषणापत्र भरावे. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात विमानात तसेच विमानतळांवर उद्घोषणा करण्यात याव्यात. तसेच प्रवाशांकडून विमानतळावर तसेच विमानत चढ-उतार करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. प्रवाशांनी राज्यातील विमानतळावर उतरल्यानंतर स्वयंघोषणापत्र भरुन सादर करावयाचे आहे. विमानतळावर तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक कार्यरत असेल याची काळजी नोडल अधिकारी यांनी घ्यायची आहे. विमानतळाचे नियमीतपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असून साबण, सॅनिटायजर यांची उपलब्धता करण्यात यावी. प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल. सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल आणि केंद्र शासनाच्या यासंदर्भातील मार्गदर्शिकेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -