घरमहाराष्ट्रपोरांसाठी मजा ‘करो’ना, पालकांच्या डोक्याला ताप!

पोरांसाठी मजा ‘करो’ना, पालकांच्या डोक्याला ताप!

Subscribe

करोना व्हायरसची व्याप्ती लक्षात घेऊन सरकारने शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिल्याने ऐन मार्चमध्ये ग्रामीण भागातील मुले मे महिन्याचा माहोल अनुभवत आहेत. मात्र दिवसभर उन्हात फिरणार्‍या पोरांना सर्दी, खोकल्याचा त्रास तर होणार नाही ना, काळजीने पालकांना सतावले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात करोनाबाधित काही रुग्ण आढळल्याने सरकारने कमालीची काळजी घेण्यास सुरूवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करून शाळा, महाविद्यालयांनाही १५ दिवसांची सक्तीची सुट्टी दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र सुरळीत सुरू आहेत. सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनी किमान दिवसभरात अभ्यास करावा अशी अपेक्षा असताना जिल्ह्यात सर्वच भागात क्रिकेट आणि इतर सांघिक खेळांना ऊत आला आहे. सकाळपासूनच एखादे मैदान गाठून छोटी-मोठी मुले एकत्र येऊन क्रिकेट सामने खेळत आहेत. दिवसभर उन्हात राहिल्याने अनेकदा ही मुले थंड पेये पित असतात. परिणामी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होण्याचा धोका आहे. याचीच काळजी पालकांना लागली आहे.

- Advertisement -

अभ्यासाऐवजी खेळणे, फिरणे याला प्राधान्य दिले जात असल्याने मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आहे की काय, असा भास ग्रामीण भागातून होत आहे. काही मुले तोंडावर मास्क लावून खेळतानाचेही दृश्य पहावयास मिळते. साथीच्या आजारांची सवय असलेल्या ग्रामीण भागातील अशिक्षित व्यक्तींना करोना म्हणजे काय किंवा नक्की कशासाठी सुट्टी आहे, हेच समजत नसल्याचे दिसते. दरम्यान, कडक उन्हाळा सुरू झाल्याने एरव्ही ११ वाजल्यानंतर जाणवणारा शुकशुकाट सध्या जाणवत नाही. करोनाचा विषाणू २७ अंश तापमानात टिकत नसल्याने उन्हात फिरणार्‍यांची संख्या वाढली आहे.

ग्रामीण भागात करोनाबाबत एकूणच द्विधा मनःस्थिती असताना उन्हात खेळणार्‍या पोरांना सर्दी, खोकला किंवा तापाचा त्रास होणार नाही ना, ही भीती मात्र सर्वच पालकांना सतावत आहे. त्यांना आता पोरांना अभ्यास करा किंवा पढाई ‘करो’ना सांगण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -