घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील - अजित पवार 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील – अजित पवार 

Subscribe

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विधान अजित पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. 

सत्ता स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदा अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आले. त्यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकर्त्यांशी अजित पवारांनी साधला संवाद

- Advertisement -

 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज पिंपरी-चिंचवड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवारांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला.

सरकारवर पावणे सात लाख कोटीचे कर्ज

‘कर्ज माफी संदर्भात विधिमंडळात निर्णय घेतला जातो, आधीच सरकारवर पावणे सात लाख कोटीचे कर्ज आहे. या सगळ्या बाबी पाहून अभ्यास करून शेतकरी कर्ज माफी केली जाईल, असे अजित पवारांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार डिसेंबर पर्यंत होणार असल्याचे देखील अजित पवारांनी म्हटलयं. आता ज्यांना मंत्रीपद मिळाली आहे ते सर्व अनुभवी आहेत, अस देखील ते पुढे म्हणाले आहेत. दरम्यान, आत्ता जे खाते वाटप झाले आहे ते काही काळा पुरत आहे. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, मागच्या पाच वर्षांच्या सरकार च्या काळात होते. भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात हे पूर्वी आघाडीच सरकार होत त्यावेळी काही जनांनी दहा आणि पंधरा वर्षे काम केलेले आहे’.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -