घरमहाराष्ट्रअमरावती : मुख्य अकरा मार्गांचे 'हायब्रीड अॅन्युटी' प्रकल्पातून होणार कायापालट

अमरावती : मुख्य अकरा मार्गांचे ‘हायब्रीड अॅन्युटी’ प्रकल्पातून होणार कायापालट

Subscribe

अमरावती शहरातील अंतर्गत मुख्य रस्ते मागील दोन वर्षांपासून सिमेंट काँक्रिटचे केले जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या अनेक प्रमुख मार्गांची दुर्दशा झाली आहे.

अमरावती शहरातील अंतर्गत मुख्य रस्ते मागील दोन वर्षांपासून सिमेंट काँक्रिटचे केले जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या अनेक प्रमुख मार्गांची दुर्दशा झाली आहे. दरम्यान, शासनाच्या ‘हायब्रीड अॅन्युटी’ प्रकल्पातून प्रमुख अकरा रस्त्यांच्या रुंदीकरणासह ते नव्याने तयार करण्यात येणार आहे. १ हजार ६३० कोटी रुपये खर्च करून तयार होणाऱ्या या रस्त्यांची आगामी दहा वर्ष त्याच कंत्राटदाराला देखभाल करावी लागणार आहे. या रस्त्यांच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरूवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

‘हायब्रीड अॅन्युटी’ प्रकल्पातून तयार होणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी शासन ६० टक्के खर्च करणार तर कंत्राटदाराला ४० टक्के खर्च करावा लागणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटदाराने तयार केलेल्या रस्त्यांचे आगामी दहा वर्ष त्यालाच मेंटनन्स करावे लागावे लागणार आहे. त्यानंतर शासन कंत्राटदाराची उरलेली ४० टक्के रक्कम टप्प्याटप्प्याने व्याजासहित त्याला परत करणार आहे. हे काम करताना प्रत्येक रस्ता दुपदरी होणार आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निवीदा काढण्यात आल्या असून जानेवारी महिन्यात कामाला सुरूवात हाेणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करायचा आहे. विशेष म्हणजे हे अकराही मार्ग टोलमुक्त राहणार असल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कोणताही भुर्दंड पडणार नाही. शासनाच्या ‘हायब्रीड अॅन्युटी’ प्रकल्पातून प्रमुख अकरा रस्त्यांच्या रुंदीकरणासह ते नव्याने तयार करण्यात येणार असल्याने शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाच्या या निणर्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यातील या अकरा रस्त्यांचे होणार काम

१]अमरावती ते बडनेरा जुना बायपास
२] अमरावती – कुऱ्हा ते कौंडण्यपूर
३]कठोरा ते चांदूूरबाजार
४]दर्यापूर ते वलगाव
५]दर्यापूर ते भातकुली (सायत मार्गे)
६] दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी
७] दर्यापूर ते अकोला (म्हैसांग मार्गे)
८] परतवाडा ते चिखलदरा (घटांग)
९] मोर्शी ते सालबर्डी (पाडा)
१०] अमरावती ते धामणगाव रेल्वे (चांदूर रेल्वे मार्गे)
११] वरूड ते हातुर्णा (जरुड मार्गे)

पुढील महिन्यात कामाला होणार प्रत्यक्ष सुरूवात

‘हायब्रिड अन्युटी’प्रकल्पातंर्गत अकरा रस्त्यांचे १६३० कोटी रुपये खर्च करून काम होईल. या कामाच्या निविदा काढल्या पुढील महिन्यात काम सुरू होणार आहे. रस्ता तयार झाल्यापासून दहा वर्ष मेंटनन्स त्याच कंत्राटदाराला करावे लागणार असून, हे रस्ते टोलमुक्त राहणार. विवेक साळवे, अधीक्षक अभियंता. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सांगितले .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -