घरमहाराष्ट्रविजेच्या खेळखंडोब्यामुळे त्रासलेल्या लोकांकडून हिंसा झाल्यास सरकार जवाबदार

विजेच्या खेळखंडोब्यामुळे त्रासलेल्या लोकांकडून हिंसा झाल्यास सरकार जवाबदार

Subscribe

जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
गेले काही दिवस ठाणे शहरासह अनेक भागात विजेचा लंपडाव सुरू आहे.कळवा,ठाणे शहर, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या भागातही मागील काही आठवड्यापासून विद्युतपुरवठा सात ते आठ तास खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रासले असून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावेळी हिंसा झाल्यास त्याला संबंधित यंत्रणा जबाबदार असतील, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. येत्या १५ दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर जिह्यातील सर्वच कार्यालयांवर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रामध्ये दिला आहे.

खारीगाव, पारसिक नगर विभागाची लोकसंख्या ४० ते ४५ हजारांच्या घरात आहे. पूर्वेकडील इंदिरानगर, आतकोणेशर नगर, शिवशक्तीनगर, भास्करनगर या भागातील लोकसंख्या एक लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत एमएसईबीचा कर्मचारी वर्ग अपुरा आहे. कर्मचाऱ्यांची संख्य वाढवण्याविषयी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच खारीगाव, पारसिक नगर येथील ओव्हरहेड वायर भूमीगत पद्धतीने करण्यात याव्यात, यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. खारीगाव दत्तवाडी येथे एमएसईबीचे कार्यालय असून रात्री १० नंतर येथे तक्रार निवारणासाठी कुणीच कर्मचारी हजर नसतो. याबाबत आर.डी.बेले यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

- Advertisement -

खारीगाव परिसरात खुल्या विजेच्या केबल्स, विद्युत खांब बदलणे तसेच गणा पॅलेस येथे डी.पी संदर्भात दोन वर्षांपूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे. येथील वीज डीपी पेटी रस्त्यात आहे. या डीपीसाठी जागा देण्याचीही तयारी दर्शवली आहे, या संदर्भात सहायक पोलीस आयुक्त धुमाळ यांच्या दालनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.डी.बेले, नगरसेवक उमेश पाटील यांच्यासह बैठक झाली. त्यावेळी अनेक नागरिकही उपस्थित होते. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. खारीगाव परिसरामध्ये दत्तवाडी भागातील १० ते १२ सोसायटयांचा वीजप्रवाह कळवा डिव्हिजनला जोडलेला आहे. या सोसायट्या खारीगाव परिसरात असताना कळवा विभागात जोडण्याची आवश्यकता नव्हती,अशी तक्रार या भागातील नागरिकांची आहे. या ठिकाणचा वीजप्रवाह खारीगाव येथील डिव्हिजनमध्ये जोडण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

पुढील १५ दिवसात मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती सुधारली नाही तर, जिह्यातील सर्वच कार्यालयामध्ये आंदोलने करावी लागतील. प्रसंगी हिंसा झाली तरी चालेल, पण, आता हे सर्व असह्य झाले आहे. लोकांच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहे.
-जितेंद्र आव्हाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -