घरCORONA UPDATEविद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार? राज्यपालांनी व्यक्त केली नाराजी

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार? राज्यपालांनी व्यक्त केली नाराजी

Subscribe

राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील परीक्षेसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम निर्णय घ्या, अशी सूचना या पत्रात कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. राज्यातील विद्यापीठाच्या कुलपती या नात्याने आपण हे पत्र लिहित असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यपालांच्या नाराजीमुळे आता पुन्हा एकदा राज्य विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहिला आहे.

राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षांतील परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर केला गेला. विद्यार्थ्यांना मागच्या वर्षांच्या तुलनेत सरासरी गुण देण्याचा तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असल्यास त्यांना भविष्यात परीक्षेची संधी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. या निर्णयाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे पत्र लिहले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला हा निर्णय कोणताही प्रगल्भ विचार न करता घेतल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. जर या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नसल्याचे वृत्त माध्यमात वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले असून या पत्राच्या उत्तराची आपण वाट बघत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी विद्यापीठांच्या कुलगुरुंची एक समिती गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवाकडे ६ मे २०२० रोजी सुपुर्द केला आहे. हा अहवाल अद्याप आपल्याला प्राप्त झाला नसल्याचे देखील त्यांनी या पत्रात अधोरेखित केले आहे.

तर हा निर्णय अनियंत्रितपणे घेतला असून पदवी मिळविण्याच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन करणारा आहे, असे मत यावेळी राज्यपालांनी नमूद केले आहे. तर परीक्षा देणाऱ्यांसाठी दोन वेगवेगळे निकष लागू करता येत नाही. एक परीक्षा देणार आणि एक सरासरी पध्दतीने गुण प्राप्त करणार, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तर परीक्षा देणे हे ऐच्छिक असू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

तर एकीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. एकीकडे ते लहान विद्याथ्र्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विद्यापीठांनी देखील परीक्षा घेतल्या पाहिजे, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट करीत राज्य सरकारला लक्ष केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -