घरमहाराष्ट्रकॉ. पानसरे हत्या प्रकरण; अमित देगवेकरला पोलीस कोठडी

कॉ. पानसरे हत्या प्रकरण; अमित देगवेकरला पोलीस कोठडी

Subscribe

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अमित देगवेकरवर शस्त्र पुरवण्याचा, हत्येच्या कटासंदर्भातील बैठकीत उपस्थित राहण्याचा आरोप आहे. कोल्हापूर सेशन कोर्टाने देगवेकरला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमित देगवेकरला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अमित देगवेकर हा पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी आहे. कोल्हापूर एसआयटीने त्याला बंगळुरु येथून सोमवारी मध्यरात्री अटक केली. त्याला आज कोल्हापूर सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमित देगवेकर हा कॉम्रेड गौरी लंकेश हत्या प्रकरणातीली देखील संशयित आरोपी आहे.

- Advertisement -

देगवेकरवर आहेत हे आरोप

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अमित देगवेकर याने शस्त्र पुरवणे, पानसरेच्या हत्येच्या कटासंदर्भात बेळगावमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीला उपस्थित राहणे. बेळगाव परिसरात झालेले बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी असल्याचा अमित देगवेकर याच्यावर आरोप आहे. विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी हे आरोप केले आहेत. दरम्यान, अमित देवगेकरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी अमितचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचा युक्तिवाद केला.

शार्प शूटर भरत कुरणेला अटक

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात १ डिसेंबरला शार्प शूटर भरत कुरणेला अटक करण्यात आले होते. भरत कुरणेला बंगळुरु एसआयटीने कारवाई करुन त्याला अटक केली. त्यानंतर त्यांनी त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात दिले होते. करुणे हा कॉम्रेड गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणत देखील आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -