घरट्रेंडिंगनातवंडांनी केलं आजी आजोबांचं स्वप्न पूर्ण, थेट घडवली हेलिकॉप्टरची सफर

नातवंडांनी केलं आजी आजोबांचं स्वप्न पूर्ण, थेट घडवली हेलिकॉप्टरची सफर

Subscribe

हेलिकॉप्टरच्या सफरीनंतर दोघांचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. पुणे ते चिंचोली असा हवाई प्रवास करून आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील समाधान पहायला मिळत होते.

वाढदिवस हा सर्वांच्याच आयुष्यातील एक खास दिवस असतो. तो आणखी खास आणि अविस्मरणीय होईल याचा आपण विचार करत असतो. अशाच एका वाढदिवसाची चर्चा सध्या पुण्यामध्ये पहायला मिळत आहे. आजी आजोबांचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी आजी आजोबांना नातवांनी थेट हेलिकॉप्टरची सफर घडवून आणलीय. हेलिकॉप्टरच्या सफरीनंतर दोघांचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. पुणे ते चिंचोली असा हवाई प्रवास करून आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील समाधान पहायला मिळत होते.

पुण्यात राहणाऱ्या गोडगे कुटुंबातील देवराम आणि चहाबाई हे चिंचोली गुरव गावातील सर्वात ज्येष्ठ दाम्पत्य आहेत. त्यांचा ८८ वा अभिष्टचिंतन सोहळा अविस्मरणीय करण्याचे त्यांच्या नातवंडांनी ठरवले. नातवंडांनी आजी आजोबांना थेट पुणे ते चिंचोली असा हेलिकॉप्टरचा प्रवास घडवून आणला. या जोडप्याला पाहण्यासाठी गावातील लोकांनी एकच गर्दी केली. त्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. आपल्या नातडवांनी स्वप्न केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘आम्हाला कधी वाटलं नव्हतो की आम्ही हेलिकॉप्टरचा प्रवास करू, मात्र आमच्या नातवंडांनी आमचे हे स्वप्न पूर्ण केले याचा आम्हाला खूप आनंद होत आहे’, अशा भावना आजी आजोबांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

अविनाश गोडगे आणि नंदकुमार गोडगे अशी आजी आजोबांच्या नातवंडांची नावे आहेत. यातील एक नातू वकिल तर दुसरा डॉक्टर आहे. त्यातील एका नातवाने असे सांगितले की, माझ्या लग्नात आजोबांनी माझी वरात हत्ती वरून काढून माझी हौस पूर्ण केली होती. लहानपणापासून त्यांनी आमचा सांभाळ केला आहे. माणूस जिवंत आहे तोवर त्याची सेवा करावी, असे ते म्हणाले. माणूस मेल्यानंतर त्यांचे दहावे बारावे आणि मोठे सोहळे केले जातात. त्यापेक्षा ते जोवर जिवंत आहेत तेव्हाच त्यांची हौस मौज, स्वप्ने पूर्ण करायला हवीत असे मत त्यांच्या नातवाने व्यक्त केले.


हेही वाचा – नादच खुळा! चपला घाला चार लाख कमवा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -