घरमहाराष्ट्रगुजरातच्या हिरे व्यापाऱ्याची धुळ्यात निर्घृण हत्या

गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याची धुळ्यात निर्घृण हत्या

Subscribe

स्विफ्ट डिझायर कारच्या बाजुला अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये एका हिरे व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर गावाजवळ ही घटना घडली. हा हिरे व्यापारी गुजरातचा असून दोंडाईचा-सोनगीर रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह सापडला. स्विफ्ट डिझायर कारच्या बाजुला अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

दोंडाईचा-सोनगीर रोडवर स्विफ्ट डिझायर कारच्या बाजूला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह फेकण्यात आला होता. रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे परिसरातील नगारिकांमध्ये खळबळ उजडी. स्थानिकांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन तपासणी करत मृतदेह ताब्यात घेतला. तपासमध्ये हा मृतदेह गुजरातच्या एका हिरे व्यापाऱ्याचा असल्याचे समोर आले. गोपीलाल मोतीलाल काब्रा असं या व्यापाऱ्याचे नाव आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी फिंगर प्रिंट तज्ज्ञ, श्वान पथक यांची मदत घेतली. मात्र श्वान पथकाने काही अंतरापर्यंतच मार्ग दाखवला. मात्र हत्या करुन व्यापाऱ्याजवळील रोख रक्कम आणि ऐवज लुटून नेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -