घरमहाराष्ट्रकोकणच्या राजाचे बाजारात आगमन

कोकणच्या राजाचे बाजारात आगमन

Subscribe

दिवाळीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात आल्यामुळे आंब्यांचा हंगाम लवकर सुरु होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर कोकणचा राजा हापूस आंब्याने बाजारपेठात आगमण केले आहे. सोमवारी धनत्रयोदशीच्या दिवशी हापूसने वाशीतल्या घाऊक फळबाजारात आगमन केले. रसरशीत हापूसवर व्यापाऱ्यांचे भरपूर प्रेम आहे. व्यापाऱ्यांनी यावर्षी बाजारपेठेत आलेल्या पहिल्या मोहरच्या हापूस आंब्यांची पूजा केली. या आंब्यांना दरही तितकाच चांगला मिळतो. त्यामुळे व्यापारी वर्ग खुश आहेत.

असे आले बाजारात आंबे?

एक व्यापारी दापोलीमधील उदय नरवणकर या आंबा बागायतदाराकडून आणि देवगडवरुन १२ डझन हापूस आंबे घेऊन घाऊक बाजारातील प्रमोद पाटे यांच्याकडे आला. हापूस आंब्याला बघून प्रमोद पोटेंसह बाजारातील इतर व्यापारीही खुश झाले. त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम लवकर सुरु होईल, अशी आशा त्यांनी वर्तवली.

- Advertisement -

इतक्या लवकर हापूस कसे आले बाजारात?

पावसाळ्यामध्ये थंडी पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहर आला होता. आंबा बागायतदारांनी या आंब्यांची निगा राखली. त्यामुळे बागायतदारांना आंबे हंगामाअगोदरच बाजारात पाठवता आली. बाजारात लवकर आंबे आल्यामुळे आंब्यांचा हंगाम लवकर सुरु होईल, अशी आशा व्यापारी वर्गांकडून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर कोकणात आता थंडी पडायला सुरुवात देखील झाली आहे. या थंडीमुळे आंब्यांना लवकर मोहर येऊन फेब्रुवारीपर्यंत हे आंबे बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चार ते पाच हजार रुपये प्रतिडझन

हंगामाअगोदर येणाऱ्या हापूस बद्दल लोकांना उत्सूकता असते. त्यामुळे या आंब्यांचा भावही तसा जास्तच असतो. हे आंबे बाजारात प्रतिडझन चार ते पाच हजार रुपयांमध्ये विकले जातात. त्यामुळे या आंब्यांना शक्यतो उच्चभ्रू वर्गातील लोक खरेदी करतात.

- Advertisement -

हेही वाचा – रसाळ हापूससारखा देवगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -