घरमहाराष्ट्रइंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

इंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

Subscribe

इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

राजकारणामध्ये हळूहळू सर्वच नेत्यांची मुलं सक्रिय होऊ लागले आहेत. बारामतीमधील पवार घराण्यानंतर आता इंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पीढी राजकारणामध्ये सक्रीय झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकात पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, उद्या सकाळी १० वाजता अंकिता पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अंकिता पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे अंकिता पाटील या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्याचे पुतणे म्हणजे हर्षवर्धन पाटील राजकारणात आले. त्यानंतर आता त्यांची मुलगी अंकिता राजकारणात प्रवेश करत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषद सदस्य होत्या. मात्र त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी काँग्रेसने अंकिता पाटील यांना संधी दिली आहे. येत्या २३ जून रोजी याठिकाणी पोट निवडणूक होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

आंबेडकरांना आघाडी करायचीच नव्हती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -