घरमहाराष्ट्रहृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली लाखो रुपयांची चोरी

हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली लाखो रुपयांची चोरी

Subscribe

हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी एका व्यक्तींनी लाखो रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अनिल गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

अनेक व्यक्ती स्वतःच्या मौजमजेसाठी चोरी करत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र पिंपरी-चिंचवड येथे एका ५४ वर्षीय व्यक्तीने आपल्या जीवासाठी चोरी केल्याचे समोर आले आहे. अनिल सॅमियल गायकवाड (५४) असे या व्यक्तीचे नाव असून या व्यक्तीने हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुर्दैव म्हणजे या व्यक्तीवर उपचारापूर्वीच गुन्हा दाखल केला असून त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

उपचारापूर्वीच त्यांना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल गायकवाड हे पत्नी, मुलासह पुण्यात राहात असून त्याचे नातेवाईक हे पिंपरी-चिंचवड शहरात राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते हृदयाच्या त्रासाने त्रस्त होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. आजार बरा करण्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते, यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च लागणार होता. मात्र ते त्यांच्याकडे नसल्यामुळे ते चिंतेत होते. त्याच दरम्यान, अनिल पिंपरी-चिंचवड शहरातील नातेवाईकांकडे आले असता, त्यांनी चिंचवड येथून फिर्यादी अमोल रावळ यांच्या पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल १ लाख २२ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि मोबाईल चोरला होता. याच पैशातून अनिल उपचार घेणार होते. मात्र त्यापूर्वीच पिंपरी पोलिसांनी अनिलला अटक केली आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिरसाट अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – चोरीच्या गुन्ह्यात चार अल्पवयीन मुलांची चौकशी

वाचा – सात लाखांच्या चोरीप्रकरणी झारखंडच्या तरुणाला अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -