घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात 'हीटवेव्ह अलर्ट

महाराष्ट्रात ‘हीटवेव्ह अलर्ट

Subscribe

आगामी तीन दिवसांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई मार्फत हीटवेव्ह बुलेटिन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भात हिट वेव्हचा फटका बसणार आहे.

आगामी तीन दिवसांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई मार्फत हिटवेव्ह बुलेटिन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भात हीटवेव्हचा फटका बसणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भातील काही भागांसाठी हीटवेव्हचा अलर्ट हा नांदेड, हिंगोली, परभणी याठिकाणांसाठी देण्यात आला आहे.

याही ठिकाणी ‘हिटवेव्ह’

आयएमडीमार्फत उत्तर पश्चिम, मध्य भारतातही हिट वेव्हचा अंदाज आगामी पाच दिवसांसाठी जारी केला आहे. त्यासोबतच २५ मे ते २७ मे दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शत्यताही वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थानसाठी हा अलर्ट जारी केला आहे. दक्षिण भारतातही या कालावधीत मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात सर्वाधिक तापमानाची नोंद ही ४६.६ डिग्री सेल्सिअस इतकी नोंद चुरू (पश्चिम राजस्थान) येथे झाली आहे. तर मेघालय आणि आसाममध्येही रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

२४ तासांतील सर्वात हॉट शहरे

गेल्या २४ तासांत राज्यातील काही शहरे ही हॉट शहरे ठरली आहेत. यामध्ये पाच शहरे ही एकट्या राजस्थानमधील आहेत. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधील दोन शहरात अधिक उष्णता जाणवू लागली आहे. तर यामध्ये युपीच्या एका शहराचा देखील समावेश आहे.

  • राजस्थानमधील चुरु, श्रीगंगानगर, पिलानी, बीकानेर आणि कोटा या शहरात अधिक उष्णतेचे चटके बसले आहेत. या शहरात पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे.
  • तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपुरमध्ये सर्वात जास्त उष्णता आहे. या शहरात पारा ४५ अंशाच्या वर आहे.
  • उत्तर प्रदेश मधील झांसी या शहरात पारा ४६.१ इतका आहे. तर मध्य प्रदेश मधील नौगांव आणि खजुराहो या शहरात पारा ४५ अंशाच्यावर आहे.

    हेही वाचा – दिल्लीत तीव्र उष्णतेची लाट; कमाल तापमान ४५ अंश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -