मतदानाच्या दिवशी धुवाधार

मतदानाच्या दिवशी राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Mumbai
heavy rains forecast in maharashtra on 18 to 20 october weather

महिन्याभरात काही दिवस सोडले तर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, आज पुन्हा एकदा पावसाने मुंबईमध्ये एन्ट्री केली आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वात स्थिती असल्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात ऐन मतदानाच्या दिवशी धुवाधार होण्याची चिन्ह दिसत आहेत. तसेच राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी होण्यची शक्यता आहे.

यामुळे पडणार पाऊस

अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे हे क्षेत्र किनारपट्टीपासून लांब असल्याने फार धोका नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

या ठिकाणी पावसाची शक्यता

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवारपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे बुधवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यात मंगळवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


हेही वाचा – मुंबईत पुन्हा पाऊस; मुंबईकरांची उडाली तारांबळ