घरताज्या घडामोडीमुंबईकरांनो पुढचे २४ तास सावध राहा! अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

मुंबईकरांनो पुढचे २४ तास सावध राहा! अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

Subscribe

येत्या २४ तासांत कोकण पट्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पुढचे २४ तास सावध राहा, असे आवाहन केले आहे.

मुंबई हवामान खात्याने येत्या २४ तासांत कोकण पट्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पुढचे २४ तास सावध राहा, असे आवाहन केले आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसचे आज आणि उद्या घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागणार असून उद्या देखील पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

या अतिमुसळधार पावसाची शक्यता

उद्या, गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे वेधशाळेने येत्या ७२ तासांत कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अकतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेंने दिला आहे.

- Advertisement -

सार्वाधिक पावसाची नोंद

मुंबई शहरात विविध ठिकाणी गेल्या १२ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात सुमारे ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षातील ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस झाला आहे.


हेही वाचा – कोल्हापूरात पावसाचा हाहाकार; तब्बल ८८ बंधारे पाण्याखाली!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -