घरताज्या घडामोडीWeather Alert: मुंबई, ठाणेसह कोकणात रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारीचा इशारा

Weather Alert: मुंबई, ठाणेसह कोकणात रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारीचा इशारा

Subscribe

राज्यात एकीकडे कोरोना विषाणूचं सावट कायम आहे. या कोरोनामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे परतीचा पावसाचं राज्यात अजूनही काही भागात धुमशान सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान हवामान विभागाकडून आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रात्रभरपासून पुण्यात देखील धो धो पाऊस आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत.

या मुसळधार पावसामुळे पुणे विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या देखील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षाचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर होणार आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस अद्याप सक्रिय आहे.

- Advertisement -

सध्या अरबी समुद्राच्या दिशेने हा कमी दाबाचा पट्टा सरकत असून हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. तसेच याच पार्श्वभूमीवर रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला असून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

काल (दि.१४) ८ वाजल्यापासून ते आज ७ वाजेपर्यंत सरासरी पावसाचे तपशील

- Advertisement -

सीटी: १०५.९२ मिमी

ईएस: ६९.१८ मिमी

डब्ल्यूएस: ५८.२४ मिमी


हेही वाचा – Heavy Rain : आंध्र प्रदेश, तेलंगणात पावसाचा हाहाकार; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -