घरमहाराष्ट्रWeather Alert: मुंबई, ठाणेसह काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता

Weather Alert: मुंबई, ठाणेसह काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

मंगळवारी मुंबई व ठाणे जिल्ह्यासह काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, आज मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबई, ठाण्याबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबईतील हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होशाळीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात सर्वत्र मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील ४८ तास मुंबई, ठाणेसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे.

- Advertisement -

मंगळवारी मुंबई व ठाणे जिल्ह्यासह काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद येथे मुसळधार पावसाची शक्यता असून सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात पुढील २४ तासांत सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -