घरमहाराष्ट्रजिल्हाधिकार्‍यांचा आदेश धाब्यावर !

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश धाब्यावर !

Subscribe

वाकण-खोपाली मार्गावर अवजड वाहतूक सुरूच

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) अवजड वाहतुकीसाठी बंद असतानाही तेथून सध्या राजरोसपणे अशी वाहतूक होत आहे. पोलीस प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत पहावयास मिळत आहे. या मार्गाची झालेली चाळण व पर्यायाने वाहतुकीला येणारा अडथळा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिन्यापूर्वी तेथून अवजड वाहतुकीला मनाई करणारा आदेश बजावला होता.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला प्रभावी पर्याय ठरलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र पाऊस सुरू होताच या मार्गाची दैना उडाल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावून प्रवासीही हैराण झाले आहेत. वाहतूक संथ व कंटाळवाणी होत असली तरी अवजड वाहतूक सुरूच राहिल्याने जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश बजावला होता. विशेष म्हणजे या मार्गावरील पाली, वर्‍हाड व जांभूळपाडा येथील पूल मोठ्या व अवजड वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले होते. मात्र हे समाधान तात्पुरतेच ठरले आहे. मोठी व अवजड वाहने तेथून सर्रासपणे ये-जा करीत आहेत. दिवसापेक्षा रात्रीचे प्रमाण अधिक असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -