घरमहाराष्ट्रमदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Subscribe

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २१ लाख
सांगली व कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने २१ लाख रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी सुपूर्द केला.

यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, नितीन बनकर, आनंदराव गोळे, अनिल गजरे, विठ्ठलराव भोसले, जिजाबा पवार, कार्यकारी संचालक डी.एस. कदम, सुरेश कडलक आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

ऑल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कामगार युनियन (संलग्न) एकजूट सुरक्षा रक्षक संघटना बहुजन पँथर, रुग्ण हक्क परिषदेतर्फे कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. या वस्तू लोअर परळ (सनमिल गल्ली) येथे गोळा करून पूरग्रस्तांना पाठवण्यात आल्या.

काळाचौकी महागणपती उत्सव मंडळाकडून जीवनाश्यक वस्तू
काळाचौकीचा महागणपती उत्सव मंडळाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील धामणी आणि बामणी या दोन्ही गावात मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गावकर्‍यांना करण्यात आले.

- Advertisement -

चादर, ब्लँकेट, भांडी, तांदूळ, डाळ, बिस्कीटे, प्रथमोपचाराची औषधे, साड्या, नवीन कपडे, लहान मुलांसाठी शालेयपयोगी स्टेशनरी अशा नेहमीच्या वापरातील गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जवळपास 3 लाख 75 हजार रूपयांच्या वस्तू मुंबईवरून कार्यकर्त्यांनी नेऊन वाटप केले. मंडळाचे अध्यक्ष विजय दाऊ लिपारे, प्रमुख कार्यवाह अमन दळवी, नितीन केरकर, आशिष कामतेकर, सुनील सावंत, शेखर साळवी, संतोष दळवी, रवी मुंबरकर,अमरदीप गोसावी,अतुल मेस्त्री, पांडुरंग दाभोळकर, गणेश महाडेश्वर, उदय परुळेकर, संकेत देशमुख यांच्या नियोजनात ‘एक हात मदतीचा आपल्या माणसांसाठी’ या भावनेने मंडळाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम करण्यात आला. या उपक्रमात सांगलीतील गजानन मोरे, धामणीचे सरपंच यांनी विशेष सहकार्य केले.

नवी मुंबईकरांनी मदतीसाठी राबवले अभियान
युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण नवी मुंबईत ‘एक हात पूरग्रस्तांसाठी, एक ओंजळ माणुसकीसाठी’ या उदात्त हेतूने वस्तू स्वरुपात मदत अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मदत जमा करण्यात आले, तसेच सोशल मिडीयाच्या माध्यामतून मदत जमा करण्याचे आवाहन केल्याने ठाकुर्ली, सांताक्रूझ ते कळंबोली येथून मोठ्या प्रमाणात मदत जमा करण्यात आली. या वर्षीच्या महापुराचा सर्वात जास्त फटका हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्यातील मु.पो. खोची व चंदगड तालुक्यातील कोवाड, दुंडगे, कामेवाडी, राजगोळी, चिंचणी व कोलाडमधील बाजारपेठ यांना बसलेला असल्याने प्रतिष्ठानने या ठिकाणी मदत पोहचविण्याचे ठरविले.

पूरग्रस्त बाधित उपरोक्त नमूद केलेल्या 6 गावांतील कुटुंबांना दिलेल्या मदतीत तांदूळ, पीठ, डाळ, पोहे, रवा, साखर, चायपत्ती, सर्व प्रकारचे साबण, कडधान्ये, मसाले व कपड्यांचा समावेश होता. त्याचसोबत स्त्रिया व मुलींकरिता नमूद केलेल्या गावांमध्ये 1000 ‘सॅनिटरी पॅड’चे वाटप करण्यात आले व त्या गावांतील जि.प. शाळेला धान्य देण्यात आले. असे मिळून सबंध नवी मुंबईतून 3 ते 3.5 टन इतके वस्तुरूपी मदत जमा करण्यात आली होती. यात सर्व शहर/विभागातील रहिवाशी, खारघरचा राजा चॅरीटेबल ट्रस्ट (खारघर), रॉयल ग्रुप (नवी मुंबई), ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (तुर्भे), राजमुद्रा ग्रुप (कोपरखैरणे) अशा अनेक संस्थांचा यात समावेश होता. संस्थेच्या स्वयंसेवकांनी वस्तुरूपी साहित्याचे वाटपच नाही तर त्यांनी ताम्रपर्णी नदीच्या पुलावरून नदीतून गाळ काढण्यात ग्रामस्थांची मदत करण्यात आली.

राजिपतर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. १८ गावातील २ हजार १०० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रांमपचायत विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी यात उत्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येकांनी समोर येऊन या मदत केली. ग्रामपंचायत विभागातील अधिकारी कर्मचारी आणि जिल्ह्यातील ८०५ ग्रामसेवकांनी यासाठी मोहिमेत वैयक्तिक सहभाग घेतला. प्रत्येकाने २० प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. त्यानंतर त्यांचा संच एकत्रित करून ते अलिबाग येथे पाठविण्यात आले. २ हजार १०० कुटूंबाना प्रत्येकी वीस ते तीस दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा तयार झाला. हे बॉक्स सहा ट्रकमध्ये भरून सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागांत पाठविण्यात आले. शिरगाव, नआंद्रे, अंकळखओप, चोपडेवाडी, कवठेसार, कनेगाव, भुवनेश्वर वाडी, धनगाव, रेठारे हरणाक्ष, जुनेखेड, बुर्ली, आंबेवाडी, चिखळीवळवडे येथील कुटूंबांना ही मदत वाटप करण्यात आली.

पूरग्रस्तांसाठी २ वेळच्या भोजनाची व्यवस्था
अक्षय पात्र फाऊंडेशनने प्रशासनाच्या विनंतीनुसार या कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत पूरग्रस्तांसाठी दुपार व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली. गेल्या चार दिवसांमध्ये फाऊंडेशनने २०,००० हून अधिक लोकांना ४५,००० हून अधिक शिजवलेल्या ताज्या भोजनाची सेवा दिली. या तात्पुरत्या स्थापित करण्यात आलेल्या किचनमध्ये अन्न तयार केले जात आहे आणि अक्षय पात्र डिलिव्हरी व्हेईकलच्या माध्यमातून पूरग्रस्त भागांमध्ये नेले जात आहे. दुपारच्या भोजनाच्या वेळी डाळखिचडी दिली जात आहे आणि रात्रीच्या भोजनाच्या वेळी मटार पुलाव दिला जात आहे. अक्षय पात्र फाऊंडेशनचे अध्यक्ष (महाराष्ट्र) अमितसाना दासा म्हणाले, आम्ही कोल्हापूरमध्ये तात्पुरते किचन स्थापित करण्याच्या माध्यमातून ताजे शिजवलेले भोजन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. काल आम्ही सांगलीमध्ये आमचे दुसरे किचन सुरू केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कार्य सुरूच ठेवू आणि स्थिती अटोक्यात येईपर्यंत पूरग्रस्त भागांमध्ये त्यांच्या मदतकार्यास हातभार देऊ. वर्षानुवर्षे अक्षय पात्रने उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळसह देशातील विविध भागांमध्ये सक्रियपणे आहाराची मदत केली.

मोहोपाड्यातून ५१ हजारांची मदत
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोहोपाडा शहरातील व्यापारी असोसिएशन, छात्रभारती विद्यार्थी संघटना, श्री समर्थ सेवाभावी संस्था यांच्यावतीने काढण्यात आलेल्या मदत फेरीला दानशुरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही मदत गरजूंसाठी रवाना करण्यात आल्यानंतर व्यापार्‍यांकडून ५१ हजार रुपयांचा धनादेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आ. मनोहर भोईर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील, व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा, दत्तात्रेय खाने आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -