घरमहाराष्ट्रमदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Subscribe

मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीकडून आसाम पूरग्रस्तांना १ कोटी
मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीने आसाममधील पूरग्रस्त भागातील पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी आसाम मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी 1 कोटी रुपये दिले.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना दि मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापक संचालक जोस चार्ल्स मार्टिन यांनी धनादेश दिला. आसाम राज्यात अभूतपूर्व पूर आला होता आणि त्यामुळे मानवी व प्राणी जीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उदरनिर्वाहाच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न करीत असताना आम्ही सरकारच्या पाठीशी उभे आहोत आणि हे योगदान त्या दृष्टीने एक लहान पाऊल आहे, असे चार्ल्स मार्टिन म्हणाले.

तेरणा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कोकण भागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली,सातारा, कोल्हापूर अनेक नागरिक पूरग्रस्त झाले होते. पूर ओसरल्यानंतर सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे त्या पूरग्रस्त भागात वेगाने फैलावणार्‍या साथीच्या आजारांची होणारी लागण, हेच लक्षात घेऊन नवी मुंबई, नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे 25 डॉक्टर व 5 पॅरामेडिकल स्टाफ अशी 30 जणांची टीम गेल्या आठवड्यात सांगली व कर्नाटक येथे गेली होती. कागवड (कर्नाटक) तसेच सांगलीतील कवठे गुलंद, गणेशवाडी या गावांमध्ये जाऊन तिथे मोफत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन केले होते या सर्व शिबिरांमध्ये दोन हजारांहून अधिक पूरग्रस्त नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीरात रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे देण्यात आली. येथील अनेक नागरिकांना सर्दी खोकला तसेच अंगाला खाज सुटणे तसेच चिखलामुळे तळपायाला फोड येणे अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी या शिबीरात दिसून आल्या. दुषित पाणी, चिखल, मृत जनावरे इत्यादींमुळे रोगराई पसरून जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. पूरग्रस्तांना कोणताही संसर्गजन्य रोग होऊ नये तसेच त्यांना रोगांची लागण होऊ नये याच सामाजिक जाणिवेतून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने या आरोग्य शिबीरासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.

- Advertisement -

तेरणा हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने 2 ते 3 हजार नागरिकांना पुरेल एवढा औषधपुरवठा या गावात नेला होता, तसेच पूरग्रस्त नागरिकांसाठी नॅपकीन टॉवेल,तेल, बिस्किटे व खाण्याचे पदार्थ नेले होते.

गॅलेक्सीच्या वतीने एक हजार कुटुंबांना मदत
आपल्या ‘आप राहत’ सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) प्रोग्रामचा एक भाग म्हणून, गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स लिमिटेड (गॅलेक्सी) ने सांगली जिल्ह्यातील एक हजार पूरग्रस्त कुटुंबांना मदत दिली. गॅलेक्सीच्या कर्मचार्‍यांनी कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या मासुचीवाडी, सातपेवाडी आणि गौंडवाडी या गावात भेट दिली आणि त्यांचे वाटप केले. गॅलेक्सीचे कर्मचारी (मुंबईतील 25 सदस्यांसह) स्वत: पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला आणि बाधित लोकांना मदत साहित्य वाटप केले.

- Advertisement -

हजार कुटूंबातील प्रत्येक सदस्याला खाद्य पदार्थ (तांदूळ, डाळ, तेल, चणा, गव्हाचे पीठ, मीठ, चहा आणि साखर) तसेच घरगुती व स्वच्छता वस्तू (चादर, सतरंजी, मेणबत्त्या, मॅच बॉक्स, मच्छर भरणारे, साबण) मिळाला. गॅलेक्सी सर्फॅक्टँट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यू. शेखर म्हणाले, महाराष्ट्रात पूर आला. हजारो कुटुंबे घरातून विस्थापित झाली. एक संस्था म्हणून, गॅलेक्सीचा ठामपणे विश्वास आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) हे सामाजिक तत्त्वांशी जोडलेले आहे. आमच्या मुख्य सीएसआर तत्त्वांच्या अनुषंगाने आम्ही, गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स येथे, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील 1000 कुटुंबांना सहानुभूती व पाठिंबा दर्शविला आहे कारण आम्हाला विश्वास आहे की कॉर्पोरेट्सची एक प्राथमिक जबाबदारी म्हणून आवश्यक वेळी समाजाची परतफेड करणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना आधार
खांदा वसाहतील आझाद ज्येष्ठ नागरिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामधील सभासदांनी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांकरता एक पाऊल पुढे टाकत आर्थिक मदत जमा केली. त्याचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या माध्यमातून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुरात हजारो जणांचा संसार उद्ध्वस्त झाला. येथील जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या पूरग्रस्तांच्या मदतीकरिता खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक सुद्धा मागे राहिले नाहीत. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना आधार म्हणून आपल्या क्षमतेप्रमाणे आधार देण्याचे काम त्यांनी करण्याचा संकल्प केला. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी सभापती संजय भोपी यांच्यासह आझाद जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.

दिव्यातील २ हजार पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवा शहरात पाणी शिरल्यामुळे असंख्य कुटुंबांचे नुकसान झाले होते. महापालिकेकडून अतिशय कमी नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा शहरातील दोन हजार पूरग्रस्त कुटुंबांना विविध साहित्याचे वाटप करून शिवसहाय्य मदतकार्य करण्यात आले. यापूर्वी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा विभागातील पाच हजार पूरग्रस्त कुटुंबियांना साहित्याचे वाटप करण्यात आले होते. विकास म्हात्रे गेटसमोरील बाजू, साईनाथ नगर, गणपती मंदिर मागील बाजू, दळवी नगर, बेडेकर नगर, खरवली देवी नगर, मिलिंद नगर, आनंद नगर पोलीस स्टेशन समोर, मुंब्रा देवी कॉलनी मौसम टॉकिज जवळ, ओमकार नगर, वक्रतुंड नगर, संतोष नगर, जय अंबे चाळ समाधान नगर या परिसरातील दोन हजार पूरग्रस्त कुटुंबाना मदतकार्य करण्यात आले. यावेळी दिवा व्यापारी संघटनेने विशेष सहकार्य केले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने शिवसहाय्य मदतकार्य करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला तांदूळ, डाळ, पीठ, मीठ, साखर, चहा पावडर, मसाला, हळद, खोबरेल तेल, साबण, चटई, टॉवेल इत्यादी साहित्य पुरविण्यात आले. त्यावेळी विधानसभा संघटक ब्रम्हाशेठ पाटील, दिवा व्यापारी संघटना अध्यक्ष चेतन भीम पाटील व सहकारी, उपतालुकाप्रमुख सुखदेव पाटील, मुकेश पाटील, नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील,युवासेना युवाअधिकारी कल्याण ग्रामीण विधानसभा योगेश म्हात्रे विभाग प्रमुख भालचंद्र भगत, अरुण म्हात्रे, शाखाप्रमुख निरंजन चुडनाईक, वासुदेव पाटील, श्याम काठे, अरविंद भोईर, विश्वनाथ पाटील, मुकेश भोईर अभिषेक ठाकूर, आशिष भोईर, संजय भोईर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जतमधून पूरग्रस्तांना साहित्य
सांगली, कोल्हापूर व सातारा येथील पूरग्रस्तांना कर्जत तालुक्यातील शेलू भोले बालाजी फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ट्रस्टने सातारा येथील मांडवे-टोळेवाडी (पिरेवाडी-भैरवगड) भागातील 150 कुटुंबियांना दैनंदिन गरजेच्या साहित्याचे वाटप केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश कोलेकर हे स्वतः आपल्या सहकार्‍यांसोबत तेथे गेले होते. ट्रस्टबरोबरच जगदीश भोईर, भरत जोशी, किरण खोलप, चामुंडा किरणा स्टोअर्स, प्रमोद झुंजाराव, केबीके नगर-शेलू यांचेही यात मोलाचे सहकार्य लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -