घरमहाराष्ट्रहिंजवडी 'आयटी हब'ला हाय अलर्ट जारी केल्याची अफवा!

हिंजवडी ‘आयटी हब’ला हाय अलर्ट जारी केल्याची अफवा!

Subscribe

काश्मीर भागातील पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी हबला हाय अलर्ट जारी केल्याची चर्चा सुरू आहे.

काश्मीर भागातील पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर अवघ्या देशात याचा निषेध आणि संताप सुरू आहे. परंतु, याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी हबला हाय अलर्ट जारी केल्याची चर्चा सुरू आहे. हिंजवडी पोलिसांनी मात्र आमच्याकडे अशा प्रकराची माहिती नसल्याचे सांगितले असून ही अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच इन्फोसिस या नामांकित कंपनीला CISF ची सुरक्षा असून त्यांच्याकडे देखील हाय अलर्टविषयी माहिती आली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे खरचं आयटी हबला हाय अलर्ट जारी आहे का, हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे.

अद्याप केंद्राकडून सूचना नाही 

सविस्तर माहिती अशी की, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी येथील आयटी हबला सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून हाय अलर्ट जारी केल्याची शहरात चर्चा सुरू असून नागरिक आणि संगणक अभियंत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. परंतू अशा प्रकारचा हाय अलर्ट जारी नसल्याचे हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, हाय अलर्ट विषयी कुठल्याही प्रकारचा मॅसेज आलेला नाही. अलर्ट जारी केल्यानंतर किंवा झाल्यानंतर सेंट्रल गव्हरमेंट यांच्याकडून स्थानिक पोलिसांना माहिती दिली जाते असे ते म्हणाले.

- Advertisement -

ही अफवाच 

हिंजवडी आयटी हबमध्ये अनेक परदेशी कंपन्या आहेत. त्यामुळे तेथील काही कंपन्यांना CISF ची सुरक्षा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र त्यांना देखील अशी माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हिंजवडी आयटी हबमध्ये हाय अलर्ट जारी आहे का नाही यावर मात्र प्रश्न चिन्ह असून ही अफवाच असल्याचे सध्या तरी समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी देखील हिंजवडी येथील नामांकित कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे दिल्याची अफवा पसरली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -