घरमहाराष्ट्रपट्रोल-डिझेल दरवाढ थांबता थांबेना....

पट्रोल-डिझेल दरवाढ थांबता थांबेना….

Subscribe

पेट्रोल-डिझेल दरवाढ


कर्नाटक निवडणुकीनंतर शुक्रवारी सलग १२व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल दरासंदर्भात सरकारवर सर्वत्र टीका होत असतानाही पेट्रोल दरात वाढ होणे मात्र थांबत नाहीये. या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

शुक्रवारी तेल कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपये ६५ पैशांनी मिळत आहे, तर डिझेल प्रतिलिटर ७३ रुपये २० पैसे दरात उपलब्ध आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात मिळत आहे.
वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे.
काही सर्वसामांन्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत ट्विटरच्या माध्यमातून रोश व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -