घरमहाराष्ट्रहोम क्वॉरंटाईन असताना पुण्यात १५ व्यक्तींचा एकाच वाहनातून प्रवास

होम क्वॉरंटाईन असताना पुण्यात १५ व्यक्तींचा एकाच वाहनातून प्रवास

Subscribe

हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या असताना हे कुटुंब एकाच गाडीतून प्रवास करताना सापडलं

कोरोना व्हायरसची लक्षण आढळल्यास रूग्णालयात तपासणी करून त्या व्यक्तीला होम क्वॉरंटाईन अर्थात घरातच राहण्याची सूचना आवर्जून दिली जाते. जर व्यक्तीच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारल्यास त्या व्यक्तीला १४ दिवस घरी राहणं बंधनकारक असतं. मात्र असे असताना देखील एक धक्कादायक प्रकार पुण्यातील वडगाव मावळ पोलिसांनी ही बाब उघडकीस आणली आहे. होम क्वॉरंटाईनचे शिक्के असणारे १५ व्यक्ती एकाच वाहनातून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

असा घडला प्रकार

उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीच्या दिशेने निघाले होते. २२ मार्च रोजी जनता कर्फ्युच्या रात्री एका पाहुण्याच्या अंत्यविधीला हे कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यात गेले होते. मात्र महाराष्ट्र लॉकडाऊननंतर थेट भारत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. दरम्यान या कुटुंबाच्या हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र होम क्वॉरंटाईन पूर्ण होण्याआधी तिथेच थांबण्याच्या सूचना दिल्या असताना या कुटुंबाने मुंबईच्या दिशेने प्रवास करत रवाना झाले.

- Advertisement -

CoronaEffect: होम क्वारंटाइन असलेल्यांना पाठवावा लागणार सेल्फी

नाकाबंदीत तपासणीदरम्यान उघड

या एका कुटुंबाने मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रवास सुरु झाला पण पुण्यातील वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांना नाकाबंदीत अडवून त्यांची तपासणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना उपाययोजना कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला असून चालक आणि त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना जवळील निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -