पुण्यात लष्कर परिसरात घरं कोसळली

पुण्यातील लष्कर परिसरातील दोन विविध घटनांमध्ये दोन घरं कोसळल्याची घटना घडली आहे.

Pune
homes collapsed in Pune
लष्कर परिसरात घरं कोसळली

कोंढवा, आंबेगाव खु्र्द येथे संरक्षक भिंत कोसळून बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता लष्कर परिसरातील दोन विविध घटनांमध्ये दोन घरं कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तर एक मजली घर कोसळ्याच्या घटनेत दोन वासरांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – नाशिक : पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

महात्मा गांधी रोड येथे सायंकाळी ५.१५च्या सुमारास राम मंदिरासमोरचे एक तीन मजली घर कोसळले. अग्निशमन दलाने कोसळलेल्या घरातील नागरिकांना बाहेर काढले. अग्निशमनदलाच्या मदतीमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसऱ्या घटनेत पुण्यातील लष्कर परिसरात आज सायंकाळच्या सुमारास कुंभार बावडी येथील जुने एक मजली घर कोसळले. या घटनेत दोन वासरांचा मृत्यू झाला. तसेच महात्मा गांधी रस्त्यावरील तीन मजली घराचा काही भाग कोसळल्याचीही घटना घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जान मोहम्मद रस्त्याजवळ कुंभार बावडीसमोरील सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक मजली जुने घर कोसळल्याची घटना घडली. मागील १० वर्षांपासून हे घर बंद होते. या घटनेत दोन वासरांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.