होळी-रंगपंचमीसाठी हॉस्पिटलेही सज्ज 

होळीला अतिउत्साहामुळे रूग्ण जखमी किंवा रंग संसर्गित होते. यामुळे मुंबईतील प्रमुख सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये विशेष विभाग, डॉक्टर आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत.

Mumbai
holi festival
होळी

मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसधारण हॉस्पिटलमध्ये दहीहंडी उत्सवाप्रमाणे होळीलाही अतिउत्साही जखमी किंवा रंग संसर्गित रुग्णांची गर्दी होते. होळी आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीमुळे धोकादायक रंग उधळल्यास त्वचा, डोळे, कान, नाक, घसा या अवयवांना इजा होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील प्रमुख सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये विशेष विभाग, डॉक्टर आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत. कारण गेल्या वर्षीही रंग संसर्गाच्या तक्रारी घेऊन रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

भांग, गांजा, रंग यांच्या धोकादायक वापराच्या तक्रारी होळी-रंगपंचमी या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळे सर्वसाधारण हॉस्पिटलमधील बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टर आणि  कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाते. त्यामुळे, मुंबईतील प्रमुख हॉस्पिटलपैकी केईएम, सायन, नायर, आणि जे.जे हॉस्पिटल्स तयारीत आहेत. हॉस्पिटल्समध्ये विशेष तयारी करण्यात येते. उपचारांसाठी खाटांची संख्या वाढवली जाते. डॉक्टर-कर्मचाऱ्यांनाही सुचना दिल्या जातात. तसेच विशेष प्रसंगी अत्यावश्यक वॉर्ड आरक्षित केला जातो.

याविषयी अधिक माहिती देताना सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले की, ” ज्याप्रमाणे रुग्ण येतील त्याप्रमाणे खाटा, वॉर्ड आणि कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. होळी-रंगपंचमीच्या दिवसाचे महत्व ओळखून हॉस्पिटलकडून कर्मचाऱ्यांनाही सुचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी तेवढ्या तक्रारी नव्हत्या. तरीही ऐनवेळी तारांबळ उडू यासाठी पूर्वतयारी ठेवावीच लागते.

तर राज्य सरकारचे जे. जे हॉस्पिटलमध्येही तयारी करण्यात आली असल्याचे प्रसारमाध्यम समन्वयक डॉ. अभिजीत जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. येथील नेत्रविभाग, कान नाक घसा विभाग, ऑर्थो विभाग तसेच त्वचा विभागही तत्पर ठेवण्यात आला आहे. त्याच सोबत नशेवरील उपचारासाठी मेडिसीन विभागही तत्पर ठेवण्यात आला आहे.

रासायनिक रंगामुळे डोळ्याला त्रास होणे, त्वचा संसर्ग होणे, नाक-कान-घशात रंग गेल्यास अंतर्गत अवयवांना ईजा होणे अशा घटना घडतात, त्यामुळे होळी खेळा पण, अवयवांचीही काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर्स करतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here