लॉकडाऊनमध्ये वीज वापरात चढता आलेख

Mumbai
household usage

लॉकडाऊनच्या काळात घरगुती विजेच्या वापरामध्ये मोठी वाढ पहायला मिळाली आहे. या काळात सरासरी विजेचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन राज्यांमध्ये विजेच्या वापरातून हा ट्रेंड समोर आलेला आहे. एका संपुर्ण महिन्यात झालेल्या सर्वेक्षणातून घरगुती ग्राहकांचा सरासरी वीज वापर वाढला असल्याचे पहायला मिळाले आहे. घरगुती ग्राहकांमध्ये सरासरी विजेचा वापर हा २६ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तर एसी वापरकर्त्या ग्राहकांमध्ये ४५ ते ६० विजेचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रयास ऊर्जा गटामार्फत हा अभ्यास करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जवळपास ८१ घरांचे सर्वेक्षण ४ मार्च ते ५ मे या कालावधीत करण्यात आले. कोव्हिड १९ चा परिणाम हा वीज वापरावर कसा होतो याची पडताळणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. विजेचा वापर कसा होतो तसेच वीज पुरवठ्याची गुणवत्ता यासारख्या गोष्टी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासण्यात आल्या. घरगुती ग्राहकांमध्ये ज्यांच्या घरी एसीचा वापर नाही अशा वीज ग्राहकांमध्ये २६ टक्के जास्त विजेचा वापर लॉकडाऊनच्या आधीच्या कालावधीपेक्षा झाल्याचे आढळले आहे. तर एसी असलेल्या घरांमध्ये हा विजेचा वापर ४५ टक्के ते ६० टक्के वाढल्याचे पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील वीज वापरातून दिसून आला आहे. एसी नसलेल्या घरांमध्ये सरासरी वीज वापर हा पुण्यात २२ टक्के, औरंगाबादमध्ये ३५ टक्के, उत्तर प्रदेशातील कानपुर येथे ११४ टक्के आणि गोंदा येथे ४५ टक्के इतका विजेचा अतिरिक्त वापर दिसून आला आहे. पुण्यात सरासरी तापमानात ३ ते ४ टक्के वाढ झाल्याने पुण्यात विजेच्या वापरात वाढ दिसून आली आहे. पुण्यात सरासरी ८ टक्के विजेच्या वापरात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्र सरकारने २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती. लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्यानंतरही विजेच्या वापरात वाढ झाल्याचे आढळले आहे. एकीकडे इंडस्ट्री आणि कमर्शीअल विजेचा वापर घटलेला असताना दुसरीकडे मात्र घरगुती वीज ग्राहकांकडून विजेच्या वापरात वाढ पहायला मिळाली आहे. संपुर्ण देशभरात २२ टक्के इतकी मोठी वीज वापरात घट झाल्याचे निदर्शनास आले होते. पण लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरातच जास्त वेळ घालवल्याने घरगुती विजेच्या वापरात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. महत्वाच म्हणजे दिवसाच्या वेळातच विजेचा सर्वाधिक वापर झाल्याचे आढळले आहे. सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ६ वाजेपर्यंत सरासरी विजेचा वापर वाढला आहे. तर रात्रीच्या वेळेत घरगुती ग्राहकांकडून विजेच्या वापरात एसीचा वापर सर्वाधिक आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रमाण कमी होते. दिवसापोटी पुण्यात १० मिनिटांचे आऊटेज ग्राहकांनी अनुभवले आहे. तर ग्रामीण भागात सरासरी आऊटेजचे प्रमाण हे १ तास ते २ तास इतका वेळ होते. तर उत्तर प्रदेशात सरासरी आऊटेजचे प्रमाण हे ५ तास ते ६ तास इतके होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here