घरमहाराष्ट्रपवना नदी वाचवण्यासाठी मानवी साखळी

पवना नदी वाचवण्यासाठी मानवी साखळी

Subscribe

पिंपरी-चिंचवड या शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी नागरिकांनी मंगळवारी सकाळी मानवी साखळीचे आयोजन केले होते. याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रदूषित नद्यांमध्ये पवना नदीचा समावेश झाला आहे. या मानवी साखळीत महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकला जात आहे, त्यामुळे नदीपात्राची रुंदी कमी होत आहे. भविष्यात येथील दीड हजार नागरिकांना पुराचा धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे राज्यासह देशातून याठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यासाठी आहे. तसेच शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या मुख्य नद्या वाहतात, मात्र या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णीने आक्रमण केले आहे. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासाठीच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी प्रदूषणाच्या विरोधात मानवी साखळीचे आयोजन केले होते.
पवना नदीला प्रदूषणापासून वाचवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन नदी पात्राच्या पायऱ्यांवर नागरिकांनी लांबच लांब मानवी साखळी केली. यात लहान मुलांसह महिला, तरुणांनी मोठी उपस्थिती लावली होती.
यावेळी विरोधी पक्ष नेते दत्ता साने, नगरसेविका माई काटे, किरण मोटे, नगरसेवक राजू बनसोडे, अविनाश काटे, अनिकेत काटे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, मनोज वाखारे, रुपेश फुगे, मंगल मारणे, एकनाथ हाके, हौसा बाई वाखारे, सागर फुगे, रोहित वाजे, ओंकार वाखारे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -