घरमहाराष्ट्रभोजापूर धरणाच्या उंचीसाठी उपोषणाचा इशारा

भोजापूर धरणाच्या उंचीसाठी उपोषणाचा इशारा

Subscribe

वीस वर्षांपासून अंमलबजावणी नाही
सरकारचा सर्वेक्षण अहवाल सकारात्मक असतानाही भोजापूर धरणाची उंची नियोजित उंचीपेक्षा तीन मीटरने कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सिन्नर, संगमनेर तालुक्यातील निमोन सोनोशी, नान्नजदुमाला, काकडवाडी, पोरेगाव खुर्द, पोरेगाव बुद्रुक, तीगांव, तळेगाव दिघे इत्यादी गावांना धरणाच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय होऊन वीस वर्षे उलटली, तरी त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्याचा निषेध करण्यासाठी भोजापूर पूरचारी धरणाचे नामांतर पुतना मावशी पूरचारी असे केले. तसेच सहा जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला.
संगमनेर उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण होणार आहे. सततच्या दुष्काळी गावांमध्ये भुजल पातळी खोल गेली आहे. तर शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. भोजापूर चारीत पाणी न आल्याने या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांतील ग्रामस्थ नरक यातना भोगत आहेत. हे सर्वांपुढे आणण्यासाठी यमयातना पाहणी पथकाची स्थापना केली जाणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.
या आंदोलनात भिमराज चत्तर, किसन चत्तर, विनायक गुंजाळ, अ‍ॅड. कारभारी गवळी, धर्मराज मोकळ, सोमनाथ कडनर, पुंजाराम लाड, सोपान बोरडे, रघूनाथ मोकळ, सुनिल नेटके, छगन कडनर आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -