गुजरात, महाराष्ट्राला वादळाचा इशारा

येत्या २४ तासांमध्ये वादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai
storm warning to gujrat and maharashtra

हवामान विभागामार्फत वादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमधील दक्षिणेचा भाग आणि महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीसाठी हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेच हा वादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने एका विशेष बुलेटिनच्या माध्यमातून हा इशारा जाहीर केला आहे. येत्या २४ तासांमध्ये वादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या वादळातून गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना त्यासाठीच धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीने दिलेल्या अलर्टनुसार या वादळाचा प्रभाव २ जून रोजी उत्तर भागात असेल. तर उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातची किनारपट्टी याठिकाणी ३ जून रोजी याचा प्रभाव पहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण पश्चिम मान्सून हा केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर देशाच्या उत्तरेकडील भागात वेगवान वाऱ्यासह पडलेल्या पावसाने दिल्लीतले तापमान काही अंशी कमी होण्यासाठी मदत झाली आहे. हरियाणाणि उत्तर प्रदेश येथे आज रात्री उशिरा ताशी ३० ते ५० वेगाने मेघ गर्जनेसह पावसाला सुरूवात होईल असाही अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे दिल्लीतील हिटवेव्ह कमी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – पेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड, रेल्वे यासह ‘हे’ नियम उद्यापासून बदलणार