घरमहाराष्ट्रपत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Subscribe

घरगुती भांडणातून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्यात घडली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र भोसले (वय – ५५) असे आरोपीचे नाव आहे. संगीता भोसले (वय – ४८) असे हत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्यात नेहमीच किरकोळ भांडणं होत, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीच्या कृष्णानगर येथे अरुणा अपार्टमेंट आहे. आज दुपारच्या सुमारास राजेंद्र भोसले यांनी आपल्या पत्नीच्या हाताची नस कापून त्यांची हत्या केली. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यानंतर राजेंद्रने स्वतः पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत भोसले दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचा विवाह झाला आहे. तर मुलगा त्यांच्यासोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

मृत पती-पत्नीची आधी झटापट झाली. त्यानंतर राजेंद्र यांनी संगीताच्या हाताची नस कापली. त्या रक्ताच्या थारोळ्यात मुख्य दरवाजात आल्या. दरवाजा उघडून लोखंडी गेटमधून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मुलाला मदतीसाठी बोलावले. मुलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाठीमागील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. आणि संगीता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत संगीता यांचा मृत्यू झाला होता. तर राजेंद्र यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेचं मुख्य कारण समजलं नसून त्याचा तपास चिखली पोलीस करत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आहेर, पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमबासे आणि पोलीस कर्मचारी नाणेकर हे दाखल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -