घरमहाराष्ट्रमुलाच्या हव्यासापोटी उच्चशिक्षित पत्नीचा छळ

मुलाच्या हव्यासापोटी उच्चशिक्षित पत्नीचा छळ

Subscribe

अमेरिकेत नामांकित कंपनीत काम करणाऱ्या उच्च शिक्षित संगणक अभियंत्याने आपल्या उच्चशिक्षित पत्नीचा मुलगा होत नाही म्हणून छळ केल्याची घटना घडली आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. या कालावधीत देशाने जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती केली. ही प्रगती करत असतानाच अनेक पारंपरिक, बुरसटलेल्या विचारसरणी, प्रथांना मूठमाती देण्याचे कार्यसुद्धा करण्यात आले. मात्र तरीही आज मुलगाच वंशाचा दिवा ही बुरसटलेली मानसिकता देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहे. विशेष म्हणजे देशातील सुशिक्षित प्रजासुद्धा या मानसिकतेला बळी पडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अमेरिकेत नामांकित कंपनीत काम करणाऱ्या उच्च शिक्षित संगणक अभियंत्याने आपल्या उच्चशिक्षित पत्नीचा मुलगा होत नाही म्हणून छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात सांगवी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा – पुण्याच्या ९ वर्षीय अद्वैतने केला माउंट किलीमंजारो सर

सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षांपूर्वी ३८ वर्षीय फिर्यादी महिलेने आणि आरोपी राहुल यांनी विवाह केला होता. दोघेही उच्चशिक्षित असून संगणक अभियंता आहेत. ते अमेरिकेत नामांकित कंपनीत कामाला होते. आता सध्या फिर्यादी यांनी नोकरी सोडली असून त्या पुण्यात राहतात. दोघांना एक ७ वर्षीय गोंडस मुलगी आहे. मात्र पत्नीला मुलगा होत नाही, म्हणून त्यांना वारंवार पती राहुल मारहाण करत होते. या छळात सासरची मंडळी पतीला साथ देत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून महिलेने अखेर सांगवी पोलिसात सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती राहुल देविदास घोडतुरे, सासू कावेरी घोडतुरे, सासरे देविदास घोडतुरे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी या करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -