घरमहाराष्ट्रनागपुरात होणार हायब्रिड एरोबोट’ची निर्मीती - नितीन गडकरी

नागपुरात होणार हायब्रिड एरोबोट’ची निर्मीती – नितीन गडकरी

Subscribe

कोराडी तलावा शेजारच्या जागेवर एरोबोट निर्मीती प्रकल्प साकारणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पाणी, बर्फ आणि दलदली भागात चालू शकणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ची निर्मीती नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे होणार आहे. कोराडी तलावा शेजारच्या जागेवर एरोबोट निर्मीती प्रकल्प साकारणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी आज, शुक्रवारी नागपुरात दिली.

‘हायब्रिड एरोबोट’ची विशेषता

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी यांनी सांगितले की, जल, जमीन व हवाई तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या या अत्याधुनिक बोटींमुळे देशांतर्गत जलवाहतुकीला चालना मिळेल. विशेष म्हणजे आग्रा, अलाहाबाद येथे होणारा कुंभमेळा तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे.देशांतर्गत जलवाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता केंद्रातर्फे बहुआयामी पर्यायांचा शोध सुरू होता. याअंतर्गतच रशिया येथील ‘स्कोल्कोव्हो फाऊंडेशन’अंतर्गत तेथील काही कंपन्यांनी अल्युमिनियमद्वारे ‘हायब्रिड एरोबोट’ तयार केल्या आहेत. याबाबतच्या प्रस्तावाचे त्यांनी नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले. देशांतर्गत जलवाहतूकीसाठी सोयीस्कर असलेल्या या ‘एरोबोट’ अवघे १० सेमी पाणी असलेल्या चिखलयुक्त प्रदेशातून चालू शकतात. सोबतच बर्फातदेखील यांचा उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे या पेट्रोल, विद्युत यांच्यासोबतच ‘मिथॅनोल’वरदेखील वापरल्या जाऊ शकता. सर्वसाधारण ‘बोट्स’पेक्षा यांचा वेग हा तीन पटीने जास्त असून १७० किमी प्रति तास या वेगाने त्या पाण्यात चालू शकतात. या बोटींची प्रवासी क्षमता ही ११ ते ६० प्रवाशांपर्यंत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -