लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज – खोतकर

शिवसेना पक्षनेत उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे. अजूनही मी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही. ही जागा मी लढवेन',असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना नाव घेता दिला आहे.

Mumbai
Arjun khotkar reach on matoshri to meet uddhav thackeray
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी इच्छुक असून, अजूनही युतीच्या जागा वाटपात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षनेत उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे. अजूनही मी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही. ही जागा मी लढवेन’,असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना नाव घेता दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोतकरांनी निवडणुकीच्या आखाड्यात आपण उभे आहोत हे स्पष्ट देखील केले आहे.

युतीच्या निर्णयाचे स्वागत करतो

शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला असला तरी शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या युतीचा निर्णय मान्य करावा लागेल. युतीचे आम्ही स्वागत करु मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत याची परिस्थिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल.

माझ्या हिताचा निर्णय ठाकरे यांनी घेतला

जालना लोकसभी मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे निवडणूक लढवत आले आहेत. तसेच शिवसैनिकांनी देखील आतापर्यंत प्रामाणिकपणे प्रचार केला आहे. मात्र निवडणुकीनंतरच्या काळात अनेकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याचप्रमाणे अनेक कामांसाठी रखडवण्यात देखील येत त्यामुळे कारयकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविरोधात नाराजी आहे. शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन, कार्यकरत्यांच्या हिताचा, माझ्या हिताचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे, असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.

जालना लोकसभेबाबत अजूनही कोणता निर्णय झाला नाही, अद्याप कोणताही निरोप मला आलेला नाही, त्यामुळे मी अजूनही निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, असंही खोतकरांनी सांगितले आहे, त्यामुळे लोकसभा निवजणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात युतीसाठी काहीही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत निवडणुकीची रणनिती ठरविण्याची बैठक झाली आहे. यामध्ये जालना आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत जागांचा फॉर्म्युला ठरला असला तरी मात्र काही जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही.


वाचा – खोतकरांचा सेनेला घरचा आहेर, म्हणे ‘आरोग्य क्षेत्र बदनाम क्षेत्र’!

वाचा – मेंढी, शेळींसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणार – अर्जुन खोतकर


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here