घरमहाराष्ट्रअर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर रोखून दाखवा; राम कदमांचं...

अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर रोखून दाखवा; राम कदमांचं आव्हान

Subscribe

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींच्या अटेवरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यातील ठाकरे सरकारला आणि मुंबी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान राम कदम यांनी दिले आहे.

राम कदम यांनी ट्विट करत ते अर्णब गोस्वामींना तळोजा जेलमध्ये भेटायला जाणार असल्याची माहिती दिली आहे. मी आज सकाळी ११ वाजता अर्णब गोस्वामींना तळोजा जेलमध्ये भेटायला जाणार आहे. कोणामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा. देशातील १३० कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी भेटायला जाणार आहे, असे ट्विटमध्ये राम कदम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राम कदम यांनी रविवारी अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले. शिवाय, अर्णब यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम सुरुवातीपासून आक्रमक झाले आहेत. राम कदम यांनी सुरुवातीला मंत्रालयाच्या बाहेर उपोषण केले. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर राम कदम यांना हे आंदोलन मागे घ्यावे लागले होते.

दरम्यान, पोलिसांनी रविवारी सकाळी अर्णब गोस्वामी यांची अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णब गोस्वामी यांना मोबाईल दिल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईलवरुन अर्णब गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -