घरमहाराष्ट्रदोन दिवसात स्फोटक पत्रकार परिषद घेणार - चंद्रकांत पाटील

दोन दिवसात स्फोटक पत्रकार परिषद घेणार – चंद्रकांत पाटील

Subscribe

ग्रामपंचायत निवडणुकीत जसे यश मिळाले आहे, तसेच यश पदवीधर निवडणुकीत देखील आहे. दोन दिवसातच मी स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग झाला, हे आपल्या सर्वांसमोर मी मांडणार आहे. पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झालेली आहे, असे खळबळजनक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केले.

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत असून, यामध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल माहिती देण्यासाठी प्रदेश भाजपा तर्फे पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठवाडा पदवीधरमध्ये पाच हजार मतपत्रिका कोर्‍या निघाल्या, पुणे पदवीधरमध्ये अडीच हजार नावे ही पदवीपेक्षाही खालचे शिक्षण असलेल्यांची आली. ज्याच्यामध्ये कॉलमध्येच सातवी, आठवी असे लिहिलेले आहे. ११ हजार नावे दुबार होती.

- Advertisement -

शेवटच्या एक तासात १३७ , १३८ असे मतदान हे ९०० पैकी ३०० बुथवर झाले आहे. पदवीधरचे एक मतदान होण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो, मी पत्रकार परिषदेत याचे प्रात्यक्षिक देखील दाखवणार आहे. असे असताना शेवटच्या ६० मिनिटांमध्ये एवढे मतदान कसे शक्य आहे? एकूणच पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झालेली आहे. तरीही लोकशाहीमध्ये जो निकाल आला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. ते चार पक्ष एकत्र होते व भाजपा एकटीच होती. त्यामुळे एकप्रकारे भाजपाला पदवीधरमध्ये अपयश मिळालं असं मी मानत नाही. पण लोकशाहीमध्ये जो निर्णय येईल तो मान्य करावा लागतो, पुढील निर्णय येईपर्यंत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे व उच्च न्यायालयातही याचिका दाखल होत आहे. या सर्वांमधून आपल्याला काही निवडणुकांची पोलखोल होईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -