Friday, August 7, 2020
Mumbai
27.8 C
घर ताज्या घडामोडी धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल – राज ठाकरे

धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल – राज ठाकरे

Aurangabad
raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना पक्षाच्या बदलेल्या भूमिकेबद्दल विस्तृत भूमिका मांडली. मी मराठीचा मुद्दा सोडलेला नाही. जर मराठीला नख लावाल तर मी मराठी म्हणून मी अंगावर जाईल आणि माझ्या धर्मावर जाल तर मी हिंदू म्हणून अंगावार जाईल, असे ठामपणे राज ठाकरे यांनी सांगितले.

हिंदुत्व म्हणजे विकासाकडे लक्ष द्यायचे नाही, असे होत नाही. एखाद्या शहराचा कायापालट करत विकास करणे, हा माझा राजकीय विषय नसून माझे ते पॅशन आहे. त्यामुळे पक्षाने हिंदुत्त्व स्वीकारले असले तरी शहराच्या पायाभूत सोयी-सुविधांचा विषय मनसेच्या अग्रक्रमावर असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हिंदू जननायक उपाधी देऊ नका

२३ जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन झाल्यानंतर काही मनसैनिकांनी राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला ही उपाधी देऊ नका, असे कार्यकर्त्यांना बजावून सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ९ फेब्रुवारीच्या मोर्चात कार्यकर्त्यांनी राज ठाकरे हिंदूजननायक असल्याचे टी शर्ट घातले होते. त्यावरही आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदूजननायक ही उपाधी कार्यकर्त्यांनी तर एका वृत्तवाहिनीने दिली आहे, मला हिंदूजननायक म्हणून असे आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केले.

हे वाचा – राज ठाकरे आता ‘हिंदूजननायक’, मनसे कार्यकर्त्यांचा असा असेल ड्रेसकोड

राजमुद्रेच्या झेंड्याबद्दल राज ठाकरेंचे स्पष्टीकरण

आता बदलेला झेंडा बदलण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वीच घेतला होता. तसे पत्र देखील निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी हा दुसरा झेंडा अधिकृतपणे स्वीकारण्याचा निर्णय घेतला.