घरमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदाची कोणाची मागणी असेल तर नक्कीच विचार करू

मुख्यमंत्रिपदाची कोणाची मागणी असेल तर नक्कीच विचार करू

Subscribe

१७ नोव्हेंबरपूर्वी सत्तास्थापना नाही; शरद पवार यांचे स्पष्टीकरण

सत्ता स्थापनेसाठी बराच वेळ लागणार आहे. १७ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल तर त्याचा नक्की विचार करावा लागेल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चलबिचल सुरू झाली असून शिवसेना महाआघाडीच्या भवितव्याबाबतही शंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी भाजपच्या चिंतन बैठकीत भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊच शकत नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत केला.

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. सत्ता स्थापनेसाठी बराच वेळ लागणार आहे. १७ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन करणे शक्य नाही. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असे उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. नागपुरात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर पवार गेले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळणार असल्याचे वारंवार सांगितलेले असताना शरद पवारांनी केलेले वक्तव्य आश्चर्यचकित करणारे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचे विचार सरकारचा चालवताना धर्मनिरपेक्ष आहेत. याचा अर्थ आम्ही हिंदू, मुस्लिम अशा कुठल्या समाजाच्या विरोधात आहोत, असा होत नसल्याचे सांगत, हिंदुत्ववादाचा मुद्दा उचलून धरणार्‍या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कसे जुळवून घेणार, हा प्रश्न पवारांनी खोडून काढला.

सर्वाधिक मते आम्हालाच
देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हा राज्यात नंबर एक वर असणार पक्ष कशाप्रकारे आहे, याबाबतची माहिती चिंतन बैठकीत दिली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला पहिल्या क्रमांकाची एकूण 1 कोटी 42 लाख मतं मिळाली आहेत. त्यानंतर 92 लाख दुसर्‍या क्रमांकाची मत राष्ट्रवादीला, तर 90 लाख मतं शिवसेनेला मिळाली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

पुन्हा सत्तेत येण्यावर भाजप ठाम
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच नुकतंच भाजपच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर भाजपची पत्रकार परिषद झाली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपचे 105 आमदार निवडून आले आहेत. तर 14 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे 105+14 अशी मिळून भाजपची एकत्रित 119 संख्या येते आणि त्यामुळे भाजपला घेतल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही.

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक
माझ्या डोक्यात सध्या एकच गोष्ट येते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन! असा टोला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फडणवीस ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत, हे माहीत नव्हते, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या. महासेनाआघाडीचे हे सरकार पाच वर्षे चालणार, मध्यावधी निवडणूक होणार नाहीत, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. जनतेने बहुमत दिले असते तर अशी चर्चेची वेळ आली नसती. सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु असून लवकरच याबाबतीत अधिकृत घोषणा केली जाईल, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -