घरलोकसभा २०१९खडाजंगीसोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत निवडणूक लढवणार

सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत निवडणूक लढवणार

Subscribe

मराठीद्वेष्ट्या किरीट सोमय्या यांना भाजपने कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी देऊ नये, असा आग्रह ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी धरला होता. सध्या किरीट सोमय्या मातोश्रीवर लॉबिंग करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता शिवसैनिक देखील हट्टाला पेटले आहेत. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी तर किरीट सोमय्यांच्या विरोधात आघाडी उघडली असून जर आमचा विरोध डावलून सोमय्यांना उमेदवारी दिली तर मी स्वतः निवडणुकीला उभा राहणार, असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी जवळपास सर्व उमेदवार कामाला लागले असताना मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघाचा उमेदवार मात्र ठरता ठरेना. किरीट सोमय्या यांच्या नावाला सेनेचा तीव्र विरोध आहे. त्यातच आज किरीट सोमय्या यांनी ‘मातोश्री’ची भेट मागितली होती. मात्र त्यांना भेट नाकारण्यात आली आहे. किरीट सोमय्या हे मातोश्रीचे दरवाजे ठोठावत असल्याचे पाहून शिवसैनिक आणखी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी थेट पवित्रा घेत सौमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवू, असे जाहीर केले आहे.

- Advertisement -

म्हणून शिवसैनिक सोमय्या यांच्यावर नाराज

किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत थेट उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका केली होती. तसेच मातोश्रीचा उल्लेख थेट माफिया असा केला होता. एवढंच नाही तर पालिका निवडणुकीत खालच्या पातळीवर जात सोमय्या शिवसेनेवर टीका करत होते हीच टीका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली असून, याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक किरीट सोमय्या यांना विरोध करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -