संधी दिल्यास मावळमधून लोकसभा लढणार

Mumbai
Parth Pawar
पार्थ पवार

पक्षाने जर मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास संधी दिली, तर नक्की लढेन, कारण मावळ मतदारसंघाचा भाग असलेला पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात अजित पवार यांना मोठे पाठबळ आहे. ही सर्व ताकद कामी येऊ शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी व्यक्त केले.

राज्यापेक्षा आपल्याला केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे. केंद्रात गेल्यास आपल्यासाठी हा राष्ट्रीय मुद्यांवर काम करण्यासाठी मोठा परिघ उपलब्ध असेल. २८ वर्षीय पार्थ यांनी प्रथमच निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर जर पक्षाने यंदाच्या निवडणुकीसाठी इतर दुसर्‍या कार्यकर्त्याला मावळमधून उमेदवारी दिल्यास आपण २०२४ च्या निवडणुकीपर्यंत थांबायला तयार आहोत. त्यावेळी वयही आपल्या बाजूने असेल असेही त्यांनी म्हटले.

पिंपरी-चिंचवडच्या लोकांना आपल्या भागाचा बारामतीसारखा विकास व्हावा असे वाटत असल्याने आपण मावळमधून निवडणूक लढवावी असा इथल्या जनतेचा आग्रह आहे, म्हणून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या आमच्या कामाचे श्रेय येथील सत्ताधारी भाजप घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडून आले होते, तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर हे तिसर्‍या स्थानावर होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here