पुलवामा सारखा हल्ला पुन्हा झाला नाही तर महाराष्ट्रात परिवर्तन नक्की – शरद पवार

Aurangabad
sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला घडला होता. त्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर सरकारने बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. या एअर स्ट्राईकनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. आता पुलवामा सारखा हल्ला घडला नाही तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत नक्कीच परिवर्तन होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. औरंगाबाद येथे आज कार्यकर्ता मेळावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, “पुलवामा नंतर एअर स्ट्राईकचा फायदा भाजपला झाला. बहुमताने ते जिंकले. पुलवामाच्या हल्ल्याबाबत लष्करातील काही अधिकाऱ्यांनाच संशय आला होता. मात्र हा देशाचा विषय असल्यामुळे मी त्यांना यावर बोलू नये असे सांगितले होते.”, अशी आठवण पवार यांनी करुन दिली.