घरमहाराष्ट्रफोन हरवला...काळजी नको

फोन हरवला…काळजी नको

Subscribe

मुंबई

तुमचा हरवलेला स्मार्टफोन पुन्हा तुमच्या हातात येण्याची शक्यता वाढली आहे. सोबत हरवलेल्या स्मार्टफोनचा गैरवापर होण्याची भीतीही कमी झाली आहे. केंद्र सरकारने यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली असून, त्या क्रमांकावर फोन केल्यास पोलीस किंवा संबंधित यंत्रणांना तुमच्या फोनचे लोकेशन त्याच्या वापरकर्त्याची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. सोबतच तुमची फोन सेवा तातडीने ब्लॉक करता येणार आहे. केंद्र सरकारची ही सेवा पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू केली जाणार असून, त्यानंतर देशभर ही सेवा उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

तुमच्या हातातला मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन एव्हाना तुमची ‘जानङ्क बनला असेल… अनेक जणांना तर एक फोन अपुरा पडतो… त्यामुळे ते नेहमीच आपल्यासोबत दोन-तीन फोन बाळगतात. पण, हीच गोष्ट चोरांच्या फायद्याची ठरते. गर्दीच्या वेळी, ट्रेनच्या प्रवासात मोबाईल चोरण्यासाठी चोरांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत… किंवा कधी-कधी आपल्या निष्काळजीपणामुळेच आपण आपला महागडा मोबाईल गमावून बसतो. आणि त्यानंतर आपली जी अवस्था होते, ती तुम्ही एकदा तरी अनुभवली असेल किंवा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची अवस्था पाहिली असेल. अशावेळी तत्काळ तक्रार कुठे दाखल करायची हे लक्षात येत नाही आणि मग या स्मार्टफोनचा गैरवापर होण्याची धास्तीही असते.

हेल्पलाईन क्रमांक
यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे हरवलेला किंवा चोरी झालेला स्मार्टफोन लवकरात लवकर मिळणे किंवा कमीत कमी त्याचा गैरफायदा होऊ नये, याची खात्री करणे सोप्पे झालेय.

- Advertisement -

सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी
सरकारकडून एक सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर तयार करण्यात आले आहे. यानुसार, हरवलेल्या फोनचा आयएमईआय नंबर आणि मोबाईलशी निगडीत सर्व माहिती मिळू शकेल. तक्रारीनंतर हा फोन कोणत्याही नेटवर्कवर काम करणार नाही… पण, पोलीस मात्र सहजगत्या या फोनच्या लोकेशनपर्यंत पोहचू शकतील. दूरसंचार विभागाकडून पुढच्या काही आठवड्यांत ही सुविधा सुरू होऊ शकते. सुरुवातीला महाराष्ट्र सर्कलपासून सुरू करण्यात येणारी ही सुविधा लवकरच देशभरात लागू होईल.

कुठे तक्रार दाखल करणार?
त्यामुळे, तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्हाला केवळ १, तुमच्या स्मार्टफोनचा शोध सुरू झाला असेल.४४२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. या क्रमांकावर तुम्ही तुमची तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनच्या वाèया कराव्या लागणार नाहीत… परंतु

कसा लागणार तुमच्या फोनचा शोध
सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टरमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, सीम क्रमांक तसंच आयएमईआय क्रमांकाची नोंद असेल… हे रजिस्टर सर्व राज्यांतील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याद्वारे, तक्रार दाखल झाल्यानंतर तुमच्या या मोबाईलमध्ये दुसरं सीमकार्ड वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी त्यात कोणतेही नेटवर्क काम करणार नाही… पण, या फोनचे लोकेशन मात्र तत्काळ पोलिसांच्या हाती लागू शकेल.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -